हायलाइट्स
- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि धनगर समाजाला 50,000 बांधलेली घरे दिली जातील.
- बांधलेली घरे खालील प्रमाणे समाजामध्ये वितरित केले जाईल :-
कॅटेगरी घरांची संख्या. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 25,000 घरे. धनगर समाज २५,००० घरे - बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ ही २६९ चौरस फूट असेल.
- घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना सरकार खाली दिलेली आर्थिक मदत देखील करते :-
- डोंगराळ भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,30,000/-.
- सर्वसाधारण क्षेत्रात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,20,000/-.
Customer Care
- महाराष्ट्र विभाग, योजना, कार्यक्रम संबंधित प्रश्न टोल फ्री क्रमांक :- १८००१२०८०४०.
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२८२३८२१.
- ०२२-२२८२३८२०.
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पडेस्क ईमेल :- jdvjnt@maharashtra.gov.in.
- महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२०२५२५१.
- ०२२-२२०२८६६०.
- महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पडेस्क ईमेल :- min.socjustice@maharashtra.gov.in.
योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. |
फायदे |
|
लाभार्थी |
|
नोडल विभाग | इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र. |
सब्स्क्रिप्शन | योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज कश्याद्वारे करावा | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ऑफलाइन अर्जाच्या माध्यमातून. |
योजनेची माहिती
- महाराष्ट्रात बऱ्याच लोकांकडे त्यांची स्वतःची घरे नाहीत.
- ते झोपडपट्टीत, तंबूमध्ये, किंवा तात्पुरत्या कच्या घरात राहतात.
- त्यापैकी काही लोकांनकडे घरबंधण्यासाठी स्वतःची जमीन आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते घर बंधु शकत नाही.
- अश्या लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
- ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे राहणीमान सुधारणे आहे,त्यांना चांगले बांधलेले घर देने व घरबांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
- इतर मागासबहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन हा ह्या योजनेचा नोडल विभाग आहे.
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही राज्यात काही दुसऱ्या नावानेही ओळखली जाते ते :-
- "यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना."
- "यशवंतराव चव्हाण मोफत वसाहत योजना".
- सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 600/- कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जाहीर केले.
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत , महाराष्ट्र शासन सर्व पात्र असलेल्या लोकांना 50,000 बांधलेले घर देईल.
- ह्या बांधलेल्या 50,000 घरांपैकी 25,000 घरे ही विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना आणि बाकी 25,000 बांधलेली घरे धनगर समाजातील लोकांना दिली जाणार आहेत.
- वसाहती ह्या २० कुटुंबे/ २० घरे अश्या समूहासह बांधल्या जातील.
- बांधलेल्या घरांव्यतिरिक्त, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत नव्याने बांधलेल्या वसाहतींमध्ये पुढील सुविधाही प्राप्त होतील :-
- अंतर्गत रस्ते.
- ड्रेनेज.
- पाणी पुरवठा.
- वीज पुरवठा.
- कम्युनिटी हॉल. (समाज मंदिर)).
- ज्या लोकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 1,20,000/-प्रती वर्ष पेक्षा जास्त आहे अशी लोक यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत स्वतची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल.
- रु. 1,30,000/- डोंगराळ भागात आणि रु. 1,20,000/- साधारण क्षेत्रामध्ये, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून दिले जाईल.
- पात्र असलेले लाभार्थी महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपलब्ध असलेल्या ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
फायदे
- महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि धनगर समाजाला 50,000 बांधलेली घरे दिली जातील.
- बांधलेली घरे खालील प्रमाणे समाजामध्ये वितरित केले जाईल :-
कॅटेगरी घरांची संख्या. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 25,000 घरे. धनगर समाज २५,००० घरे - बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ ही २६९ चौरस फूट असेल.
- घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना सरकार खाली दिलेली आर्थिक मदत देखील करते :-
- डोंगराळ भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,30,000/-.
- सर्वसाधारण क्षेत्रात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,20,000/-.

पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमच रहिवासी असावा.
- अर्जदार हा बेघर असावा त्याचे स्वतःचे घर नसावे.
- अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1,20,000/- पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार हा खाली दिलेल्या कोणत्याही कॅटेगरीपैकी असावा :-
- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती
- धनगर समाज
- अर्जदार हा त्याच्या/तिच्या कुटुंबासह तंबू, झोपडी किंवा कच्चा घरात राहत असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली कागदपत्रे गरजेचे आहेत :-
- निवासाचा पुरावा/ अधिवास प्रमाणपत्र.
- बँक खाते माहिती.
- जातीचे प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- अक्षम प्रमाणपत्र. (अपंग व्यक्तीसाठी)
- पतीचा मृत्यू प्रमाणपत्र. (विधवा महिलांसाठी)
- पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र. (विधुर पुरुषांसाठी)
- पालक मृत्यू प्रमाणपत्र. (अनाथांसाठी)
- पासपोर्ट साइज फोटो.
- मोबाईल नंबर.
अर्ज कसा करावा
- लाभार्थी महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा ऑफलाइन अर्ज भरून लाभ घेऊ शकतात.
- महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा ऑफलाइन अर्ज विनामूल्य, संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपलब्ध असेल.
- अर्ज घ्या आणि तो काळजीपूर्वक भरा.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा.
- त्याच जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज जमा करा.
- मिळालेल्या अर्जासह कागदपत्रांची तपासणी ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
- तपासणीनंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल आणि लाभार्थींना त्यांच्या मोबाईल फोनवर एसएमएस किंवा ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
- निवडलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत बांधलेले घर किंवा घर बांधण्यासाठी मोफत मदत मिळेल.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग पोर्टल.
- महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग पोर्टल.
- महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मार्गदर्शक सूचना.
संपर्काची माहिती
- महाराष्ट्र विभाग, योजना, कार्यक्रम संबंधित प्रश्न टोल फ्री क्रमांक :- १८००१२०८०४०.
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२८२३८२१.
- ०२२-२२८२३८२०.
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पडेस्क ईमेल :- jdvjnt@maharashtra.gov.in.
- महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२०२५२५१.
- ०२२-२२०२८६६०.
- महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पडेस्क ईमेल :- min.socjustice@maharashtra.gov.in.
- महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र,
पहिला मजला, ॲनेक्स बिल्डिंग, मंत्रालय,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००३२.
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Caste | Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|---|
Stay Updated
×
Comments
i have land i want to…
i have land i want to construct how do i apply financial assistance
house need vasai
house need vasai
House need in Ap. Kalgaon tq digras Dist Yavatmal maharashtra
Need a house
Please give me a best house
i need housing assistance
i need housing assistance
scheme funds used in illegal…
scheme funds used in illegal construction
Ghar milane ke vajah se Patra
Mujhe bhi apna khud ka ghar chahie
घर आवास
घर आवास योजना
25
25
नवी प्रतिक्रिया द्या