
हायलाइट्स
- एआयसीटीई सक्षम शिष्यवृत्ती योजनेद्वारे सर्व पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती म्हणून खालील आर्थिक सहाय्य देण्यात येईल :-
- दर वर्षी रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती.
- शिष्यवृत्तीचा कालावधी हा पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ४ वर्षे आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ३ वर्षे आहे.
Customer Care
- सक्षम शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना हेल्पडेस्क ईमेल :- saksham@aicte-india.org.
- एआयसीटीई हेल्पलाइन नंबर :- ०११-२६१३१४९७.
- एआयसीटीई हेल्पडेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पलाइन नंबर :- ०१२०-६६१९५४०.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
माहिती पुस्तक
योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | सक्षम शिष्यवृत्ती योजना. |
शिष्यवृत्तीची संख्या | सर्व पात्र विद्यार्थी विशेष-अपंग/ विशेष-आव्हानात्मक विद्यार्थी. |
शिष्यवृत्तीची रक्कम | रु. ५०,०००/- दर वर्षी. |
शिष्यवृत्तीचा कालावधी |
|
नोडल विभाग | अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. |
नोडल मंत्रालय | शिक्षण मंत्रालय. |
सबसक्रीपशन | योजनेबद्दल अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत | सक्षम शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाइन अर्ज याद्वारे. |
परिचय
- सक्षम शिष्यवृत्ती योजना ही अपंग विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय अर्थसंहाय्यित शिष्यवृत्ती आहे.
- ही योजना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे लागू केली जाते.
- ही प्रामुख्याने विशेष सक्षम/ विशेष आव्हान असलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करते.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश हा शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे जेणेकरून ते त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील.
- या योजनेला विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना असेही म्हणतात.
- एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेत शिकत असलेल्या सर्व विशेष आव्हानीत/ विशेष सक्षम विद्यार्थ्यांना दर वर्षी शिष्यवृत्ती प्रदान करळी जाईल.
- सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रु. ५०,०००/- दरवर्षी प्रदान केले जातील.
- विद्यार्थी ही शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या महाविद्यालयाची फी भरण्यासाठी आणि अभ्यासाशी संबंधीत वस्तु खरेदी करण्यासाठी वापरू शकतात.
- केवळ शारीरिकदृष्ट्या आव्हान/ अपंग विद्यार्थी ज्यांचे अपंगत्व टक्केवारी ४० तककेपेक्षा जास्त आहे तेच सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र आहेत.
- पदवीधर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ४ वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळेल.
- आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ३ वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळेल.
- टेक विद्यार्थी पात्र आहेत ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दर वर्षी रु. ८,००,०००/- पेक्षा कमी आहे.
- २०२३-२०२४चा अर्ज सक्षम शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१-०१-२०२४ पर्यत अर्ज करण्यासाठी खुला आहे.
- पात्र विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
- सक्षम शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाइन अर्ज हा राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध आहे.
योजनेचे फायदे
- एआयसीटीई सक्षम शिष्यवृत्ती योजनेद्वारे सर्व पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती म्हणून खालील आर्थिक सहाय्य देण्यात येईल :-
- दर वर्षी रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती.
- शिष्यवृत्तीचा कालावधी हा पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ४ वर्षे आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ३ वर्षे आहे.
पात्रता निकष
- विद्यार्थी भिन्न- अक्षम/ विशेष आव्हानात्मक असावेत.
- विद्यार्थ्याची अपंगत्व टक्केवारी ४० टक्क्यांइतकी किंवा त्याहून अधिक असावी.
- विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न दर वर्षी हे रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
- एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये यूजी पदवी लेव्हल अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा लेव्हल अभ्यासक्रम यामध्ये प्रवेश घेणारे.
- पहिल्या वर्षाचे किंवा दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी (लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश) पात्र आहे.
- विद्यार्थ्याची शैक्षणिक संस्था एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त असावी.
- उमेदवार कोणत्याही केंद्र/ राज्य/ एआयसीटीई मंजूर शिष्यवृत्तीचा लाभार्थी नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- सकाशम शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करतांना अपलोड करायचे कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :-
- १० वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट.
- १२ वी प्रमाणपत्र (पदवी स्तराच्या बाबतीत) आणि मार्कशीट.
- आयटीआय प्रमाणपत्र (डिप्लोमा स्तरासाठी लॅटरल एंट्रीच्या बाबतीत) आणि मार्कशीट.
- डिप्लोमा प्रमाणपत्र (पदवी स्तरसाठी लॅटरल एंट्रीच्या बाबतीत).
- उमेदवार एससी/ एसटी/ ओबीसी चा असल्यास जात प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- अपंगत्व प्रमाणपत्र.
- बोनफाईड/ अभ्यास प्रमाणपत्र. (परिशिष्ट-१)
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र. (परिशिष्ट-२)
- नूतणीकरणाच्या बाबतीत पदोन्नती प्रमाणपत्र. (परिशिष्ट-३)
अर्ज कसा करावा
- पात्र विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
- सक्षम शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाइन अर्ज हा राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध आहे.
- विद्यार्थ्याने प्रथम नवीन नोंदणीवर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- सक्षम शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणी फॉर्ममध्ये खालील माहिती भराव :-
- अधिवास राज्य.
- शिष्यवृत्तीची श्रेणी प्री-मॅट्रिक असो किंवा पोस्ट-मॅट्रिक असो.
- नाव.
- योजनेचा प्रकार.
- जन्म दिनांक.
- लिंग.
- मोबाईल नंबर.
- ईमेल आयडी.
- बँक आयएफसी नंबर.
- बँक अकाऊंट नंबर.
- आधार नंबर.
- सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणी वर क्लिक करावे.
- पोर्टलने दिलेल्या लॉगइन महितीसह अर्ज सबमिट करण्यासाठी लॉग इन करा.
- सक्षम शियआवृत्ती योजना निवडा, सर्व आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा यावर क्लिक करा.
- अर्जाची छाननी विद्यार्थी जिथे शिकत आहे त्या संस्थेद्वारे आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशच्या तंत्रशिक्षण विभागाद्वारे जिथे विद्यार्थी राहतो तिथे केली जाईल, आणि त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी एआयसीटीई पोर्टलवर उपलब्ध होईल.
- सक्षम शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस ३१ जानेवारी २०२४ आहे.
- पात्र विद्यार्थी ३१-०१-२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती म्हणून वार्षिक सहाय्यासाठी अर्ज करू शकतात.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना नूतनीकरणाच्या अधीन आहे, म्हणून उमेदवारांना दरवर्षी त्यांच्या अर्जाचे नूतनीकरण करावे लागेल.
योजनेचे वैशिष्ट्ये
- सक्षम शिष्यवृत्ती योजना वर्षातून एकदाच उपलब्ध असते.
- अर्ज करण्यासाठी आधार नंबर आवश्यक आहे, आधार कार्डाशिवाय कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- जर उमेदवाराने अभ्यासक्रम सोडला तर पुढील शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
- एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकत असलेल्या विशेष दिव्यांग/ विशेष अपंग विद्यार्थ्यांसाठीच सक्षम शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
- या शिष्यवृत्तीमद्धे जागांची संख्या निश्चित नाही.
- सर्व पात्र उमेदवार, त्यांची संकया विचारात न घेता, सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल.
- या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातच घेता येईल.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याला त्यांना मदत करण्यासाठी पेमेंटसाठी दिले जाईल :-
- कॉलेज फी.
- संगणक खरेदीसाठी.
- स्टेशनरी.
- पुस्तके.
- साहित्य.
- सॉफ्टवेअर खरेदीसाठी इत्यादि.
- या योजनेअंतर्गत वसतिगृह शुल्क किंवा वैद्यकीय शुल्कासाठी कोणतेही अतिरिक्त अनुदान दिले जाणार नाही.
- तांत्रिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक डिप्लोमा शिकणारे भिन्न-अपंग/ विशेष आव्हान असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
- निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी एआयसीटीई वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.
- सीजीपीए चे टक्केवारीत रूपांतर करण्याची पद्धत म्हणजे सीजीपीएला ९.५ ने गुणाकार करणे. (सीजीपीए x ९.५).
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याला डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते.
- विद्यार्थ्याने पुढील वर्गात पदोन्नती न दिल्यास त्यांची शिष्यवृत्ती जप्त केली जाईल.
- शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करतांना अभ्यासक्रमाचे पदोन्नती प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
- योजनेचा लाभ घेतांना कोणत्याही कागदपत्रांची किंवा पुरावा जोडण्याची गरज नाही.
महत्वाचे फॉर्म
- सक्षम शिष्यवृत्ती योजना बोनफाईड/ अभ्यास प्रमाणपत्.र (परिशिष्ट-१)
- सक्षम शिष्यवृत्ती योजना कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र. (परिशिष्ट-२)
- सक्षम शिष्यवृत्ती योजना नूतणीकरणाच्या बाबतीत पदोन्नती प्रमाणपत्र. (परिशिष्ट-३)
महत्वाच्या लिंक्स
- सक्षम शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना नोंदणी.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना लॉग इन.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना अर्ज स्थिति.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना ॲप.
- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना पदवी अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन तत्वे.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्वे.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
संपर्काची माहिती
- सक्षम शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
- सक्षम शिष्यवृत्ती योजना हेल्पडेस्क ईमेल :- saksham@aicte-india.org.
- एआयसीटीई हेल्पलाइन नंबर :- ०११-२६१३१४९७.
- एआयसीटीई हेल्पडेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पलाइन नंबर :- ०१२०-६६१९५४०.
- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
- विद्यार्थी विकास केंद्र (एसटीडीसी),
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,
वसंत कुंज, नेल्सन मंडेला मार्ग,
नवी दिल्ली- ११००७०.
Ministry
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Caste | Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|---|
Stay Updated
×
Comments
Is disability certificate is…
yes it is mandatory
i am from delhi, ye…
Department of person with…
relax some certificate norms
Disability napne ke kya…
you have to make certificate…
mera disability ka…
what is the last to apply?
is portal open for renwal?
is it available for ITI…
renew nhi ho rhi hai meri…
i am not able to log in to…
renew krna bhool gya me apni…
out of india course ke liye…
what is the status of my…
what is the status of my saksham scholarship
नवी प्रतिक्रिया द्या