स्वनाथ शिष्यवृत्ती योजना

author
जमा करणार shahrukh on Tue, 04/06/2024 - 12:36
केंद्र सरकार CM
Scheme Open
(link is external)
Swanath Scheme Logo
हायलाइट्स
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार खालील लाभ देईल :-
    • दरवर्षी रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती.
    • शिष्यवृत्ती ही जास्तीत जास्त ४ वर्षे पदवीच्या अभ्यासक्रमासाठी व ३ वर्षे डिप्लोमाच्या अभ्यासक्रमासाठी.
Customer Care
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना हेलपडेस्क ईमेल :- consultant2stdc@aicte-india.org.
  • एआयसीटीई हेल्पलाइन नंबर :- ०११-२६१३१४९७.
  • एआयसीटीई हेल्पडेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क नंबर :- ०१२०-६६१९५४०.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव स्वनाथ शिष्यवृत्ती योजना.
शिष्यवृत्तीची संख्या
  • पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी १,००० जागा.
  • डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी १,००० जागा.
शिष्यवृत्ती रक्कम रु. ५०,०००/- दर वर्षी.
शिष्यवृत्तीचा कालावधी
  • पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ४ वर्षे.
  • डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ३ वर्षे.
नोंडल विभाग अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.(link is external)
नोडल मंत्रालय शिक्षण मंत्रालय/ उच्च शिक्षण विभाग.(link is external)
सबसक्रीपशन योजनेबाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत स्वनाथ शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज(link is external) याद्वारे.

परिचय

  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना १००% अर्थसाहाय्य योजना आहे.
  • हे अखिल भारतीय तंत्रशिक्ष परिषदे द्वारे(link is external) लागू केले जाते.
  • ही योजना विशेषतः अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर केंद्रित आहे, ज्यांचा पालकांचा कोविड १९ मध्ये मृत्यू झाला आहे, आणि शाहिद सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दल (शाहिद) यांचे वार्ड.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या  गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आधार देण्यासाठी आहे.
  • महाविद्यालयाची फी भरण्यासाठी, पुस्तके, उपकरणे, स्टेशनरी किंवा संगणक खरेदी करण्यासाठी दरवर्षी स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
  • रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती दर वर्षी सर्व पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाईल.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती ही दरवर्षी २,००० विद्यार्थ्यांना दिली जाते.
  • १,००० जागा पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि १,००० जागा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा कालावधी हा जास्तीत जास्त ४ वर्षे आहे.
  • आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा कालावधी हा जास्तीत जास्त ३ वर्षे आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे वर्षाला रु. ८ लाखापेक्षा जास्त असेल असे विद्यार्थी स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • लाभार्थी विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर(link is external) उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे(link is external) स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • विद्यार्थी २०२३-२०२४च्या शिष्यवृत्तीसाठी ३१-०१-२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करूशकतात.
  • ३१ जानेवारी २०२४ ही स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • शिष्यवृत्ती दरवर्षी नूतनीकरणाच्या अधीन आहे.

योजनेचे फायदे

  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार खालील लाभ देईल :-
    • दरवर्षी रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती.
    • शिष्यवृत्ती ही जास्तीत जास्त ४ वर्षे पदवीच्या अभ्यासक्रमासाठी व ३ वर्षे डिप्लोमाच्या अभ्यासक्रमासाठी.

पात्रता निकष

  • स्वनाथ शिष्यवृत्ती फक्त खाली नमूद केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल :-
    • अनाथ.
    • ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक कोविड १९ मुळे मृत्यू पावले.
    • शाहिद सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे कर्मचारी.
  • विद्यार्थ्याचे सर्व स्रोतांकडून कौटुंबिक उत्पन्न दर वर्षी रु. ८,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्याने पदवी/ डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रम नियमितपणे करत असावा. (१ले/ २रे/ ३रे/ ४थ्या वर्षी असावे).
  • विद्यार्थी एआयसीटिई(link is external) मान्यताप्राप्त संस्थेत शिकत असावा.
  • विद्यार्थी कोणत्याही केंद्र/ राज्य/ एआयसीटीई/ मंजूर शिष्यवृत्तीचा लाभार्थी नसावा.

आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थ्याची कॅटेगरी आवश्यक कागदपत्रे
अनाथ विद्यार्थ्यांसाठी
  • वडील आणि आईचे मृत्यू प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) किंवा नमुन्यानुसार तहसीलदार/ एसडीएम यांनी जारी केलेले प्रमाणपत्र. (परिशिष्ठ-१)
  • संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • पदवी स्तरावरील अभ्यासक्रमासाठी १०वी आणि १२वी मार्कशिट/ समतुल्य अभ्यासक्रमाची मार्कशिट.
  • डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रमासाठी १०वी/ समतुल्य मार्कशिट.
  • एससी/ एसटी/ ओबीसी-एनसीएल प्रमाणपत्र.
ज्यांचे एक किंवा दोन्ही पालकांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला अश्या उमेदवारांसाठी.
  • वडील/ आईकिंवा दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र, विशेषतः मृत्यू कोविड १९ मुळे झाल्याचे नमूद केलेले.
  • एक पालक (वडील किंवा आई)जीवंत असल्यास चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
  • संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • पदवी स्तरावरील अभ्यासक्रमासाठी १०वी आणि १२वी मार्कशिट/ समतुल्य अभ्यासक्रमाची मार्कशिट.
  • डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रमासाठी १०वी/ समतुल्य मार्कशिट.
  • एससी/ एसटी/ ओबीसी-एनसीएल प्रमाणपत्र.
सशस्त्र दलांच्या प्रभागासाठी आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान(शाहिद).

अर्ज कसं करावा

  • या योजनेसाठी अर्ज करण्याचा एकमेव मार्ग स्वनाथ शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज(link is external) याद्वारे आहे.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज(link is external) हा राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(link is external) यावर उपलब्ध आहे.
  • विद्यार्थ्यांना पहिले नवीन नोंदणी(link is external) यावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • उमेदवाराला स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणी फॉर्ममध्ये(link is external) आवश्यक माहिती भरावे लागतील :-
    • निवासी राज्य.
    • शिष्यवृत्ती श्रेणी प्री-मॅट्रिक किंवा पोस्ट-मॅट्रिक.
    • नाव.
    • योजनेचा प्रकार.
    • जन्म दिनांक.
    • लिंग.
    • मोबाइल नंबर.
    • ईमेल आयडी.
    • बँक आयएफसी कोड.
    • बँक अकाऊंट नंबर.
    • आधार नंबर.
  • सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नोंदणी वर क्लिक करा.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल विद्यार्थ्यांच्या मोबाइल नंबरवर आणि ईमेलवर लॉगइनकरण्याची माहिती पाठवेल.
  • पोर्टलने दिलेल्या लॉगइन क्रेडेंशियलसह स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज सबमिट करण्यासाठी लॉगइन(link is external) करा.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना निवडा, सर्व आवाश्यांक माहिती भर आणि अर्ज सबमिट करा यावर क्लिक करा.
  • अर्जाची तपासणी केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांची यादी एआयसीटीई पोर्टलवर(link is external) उपलब्ध होईल.
  • ही योजना नूतणीकरणाच्या अधीन आहे त्यामुळे उमेदवाराला दरवर्षी स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाने नूतनीकरण(link is external) करावे लागेल.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हे स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेस अर्ज करण्यासाठी खुले आहे.
  • विद्यार्थी स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१-०१-१०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.

निवड प्रक्रिया

पदवी स्तरसाठी

  • स्वनाथ शिष्यवृत्तीसाठी निवड पात्रता परीक्षेच्यागुणवत्तेवर आधारित आहे, म्हणजे बारावी किंवा समकक्ष परीक्षा.
  • पात्रता गुणांच्या आधारे टाय झाल्यास, टाय ब्रेक करण्यासाठी पुढील प्रक्रिया अवलंबली जाईल :-
    • ज्या उमेदवाराला १० मध्ये जास्त गुण असतील त्याला उच्च श्रेणी दिली जाईल.
    • जर १० वीचे गुण जुळले नाही तर जास्त वयाच्या उमेदवाराला उच्च रॅंक दिले जाईल.
    • जर वर नमूद केलेल्या पद्धतीमुळे टाय तुटले नाही, तर कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या उमेद्वाराला वरचे स्थान दिले जाईल.

डिप्लोमा स्तरसाठी

  • डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेच्या गुणवत्तेवर उमेदवाराची निवड केली जाईल.
  • डिप्लोमा कोर्ससाठी पात्रता परीक्षा इयत्ता १० वी आहे.
  • पात्रता गुणांवरताय झाल्यास, टाय तोडण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबली जाईल :-
    • मोठ्या वयाच्या उमेदवाराला वरचे स्थान दिले जाईल.
    • वयोमानाणे टाय सोडवला नाही तर कमी वार्षिक कौटुंबिक उत्तपन्न असलेल्या उमेदवाराला उच्च स्थान दिले जाईल.

योजनेची वैशिष्ठ्ये

  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना ही वर्षातून फक्त एकदाच उपलब्ध असेल.
  • आधार नंबर योजनेस अर्ज करण्यासाठी महत्वाचा आहे.
  • वैध आधार कार्डशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • जर उमेदवाराने यादरम्यान अभ्यास सोडला तर ती/ तो स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पुढील शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
  • एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
  • उमेदवार कोणत्याही केंद्र/ राज्य/ एआयसीटीई शिष्यवृत्तीचा लाभार्थी नसावा.
  • पात्र उमेदवारांसाठी दरवर्षी फक्त २,००० शिष्यवृत्तीच्या जागा उपलब्ध असतात.
  • उमेदवार त्यांच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना संगणक, स्टेशनरी, पुस्तके, उपकरणे, सॉफ्टवेअर इत्यादि खरेदीसाठी मदत करण्यासाठी दिली जाईल.
  • या योजनेंतर्गत वसतिगृह फी किंवा वैद्यकीय फिसाठी कोणतेही अतिरिक्त अनुदान दिले जाणार नाही.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्याची पद्धत पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर असेल.
  • तांत्रिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक डिप्लोमा शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शॉर्ट लिसटेड उमेदवारांची यादी एआयसीटीई वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.
  • सीजीपीए चे टक्केवारीत रूपांतर करण्याची पद्धत म्हणजे सीजीपीएला ९.५ ने गुणाकार करणे. (सीजीपीए × ९.५).
  • शिष्यवृत्तीची रक्कम ही उमेदवाराला त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दिली जाईल.
  • विद्यार्थ्याने पुढील वर्गात पदोन्नती न दिल्यास त्यांची शिष्यवृत्ती जप्त केली जाईल.
  • शिष्यवृत्ती अर्जाचे नूतनीकरण करतांना अभ्यासक्रमाचे पदोन्नती प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

महत्वाचे अर्ज

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
  • स्वनाथ शिष्यवृत्ती योजना हेलपडेस्क ईमेल :- consultant2stdc@aicte-india.org.
  • एआयसीटीई हेल्पलाइन नंबर :- ०११-२६१३१४९७.
  • एआयसीटीई हेल्पडेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क नंबर :- ०१२०-६६१९५४०.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्पडेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
  • विद्यार्थी विकास केंद्र (एसटीडीसी),
    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद
    वसंत कुंज नेल्सन मंडेला मार्ग,
    नवी दिल्ली- ११००७०.

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: शिष्यवृत्ती

Sno CM Scheme Govt
1 National Means Cum Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
2 प्रगती शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
3 सक्षम शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
4 Ishan Uday Special Scholarship Scheme केंद्र सरकार
5 Indira Gandhi Scholarship Scheme for Single Girl Child केंद्र सरकार
6 Central Sector Scheme of Scholarship केंद्र सरकार
7 North Eastern Council (NEC) Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
8 PM Yasasvi Scheme केंद्र सरकार
9 Central Sector Scholarship Scheme Of Top Class Education For SC Students केंद्र सरकार
10 CBSE Single Girl Child Scholarship Scheme केंद्र सरकार
11 AICTE Yashasvi Scholarship Scheme केंद्र सरकार

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: शिक्षण

Sno CM Scheme Govt
1 PM Scholarship Scheme For The Wards And Widows Of Ex Servicemen/Ex Coast Guard Personnel केंद्र सरकार
2 Begum Hazrat Mahal Scholarship Scheme केंद्र सरकार
3 Kasturba Gandhi Balika Vidyalaya केंद्र सरकार
4 Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY) केंद्र सरकार
5 Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana(DDU-GKY) केंद्र सरकार
6 SHRESHTA Scheme 2022 केंद्र सरकार
7 National Means Cum Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
8 Rail Kaushal Vikas Yojana केंद्र सरकार
9 प्रगती शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
10 सक्षम शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकार
11 Ishan Uday Special Scholarship Scheme केंद्र सरकार
12 Indira Gandhi Scholarship Scheme for Single Girl Child केंद्र सरकार
13 Nai Udaan Scheme केंद्र सरकार
14 Central Sector Scheme of Scholarship केंद्र सरकार
15 North Eastern Council (NEC) Merit Scholarship Scheme केंद्र सरकार
16 Schedule Caste (SC), Other Backward Class (OBC) Free Coaching Scheme केंद्र सरकार
17 जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) च्या सिव्हिल सेवांसाठी आरसीए मोफत कोचिंग प्रोग्राम केंद्र सरकार
18 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग योजना केंद्र सरकार
19 Aligarh Muslim University Free Coaching Scheme for Judicial Examination केंद्र सरकार
20 Aligarh Muslim University Free Coaching Scheme for SSC CGL Examination. केंद्र सरकार
21 PM Yasasvi Scheme केंद्र सरकार
22 सीबीएसई उडान योजना केंद्र सरकार
23 अतिया फाउंडेशन नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग कार्यक्रम केंद्र सरकार
24 National Scholarship for Post Graduate Studies केंद्र सरकार
25 Vigyan Dhara Scheme केंद्र सरकार
26 AICTE Yashasvi Scholarship Scheme केंद्र सरकार

Comments

Permalink

Meri application renew nhi…

प्रतिक्रिया
Permalink

Nice content

प्रतिक्रिया
Permalink

government have to increase…

प्रतिक्रिया
Permalink

now i have to wait for next…

प्रतिक्रिया
Permalink

is diploma student eligible

प्रतिक्रिया
Permalink

Shahid certificate kahan se…

प्रतिक्रिया
Permalink

i found difficult in making…

प्रतिक्रिया
Permalink

Number not working

प्रतिक्रिया
Permalink

mandates are too specific

प्रतिक्रिया
Permalink

very supportive

प्रतिक्रिया
Permalink

Father got martyred in North…

प्रतिक्रिया
Permalink

orphan ki definitiion kya…

प्रतिक्रिया

In reply to by shekhar (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

whose both are dead

प्रतिक्रिया
Permalink

both parents died due to…

प्रतिक्रिया
Permalink

they stop my scholarship,…

प्रतिक्रिया
Permalink

i search all the NSP but…

प्रतिक्रिया
Permalink

medical ke liye bhi…

प्रतिक्रिया
Permalink

rupees touch down to 80…

प्रतिक्रिया
Permalink

Is it on aicte website or…

प्रतिक्रिया
Permalink

NSP is open for this scheme…

प्रतिक्रिया
Permalink

is in a death certificate a…

प्रतिक्रिया
Permalink

my parents died by covid at…

प्रतिक्रिया
Permalink

is the martyr certificate…

प्रतिक्रिया
Permalink

agr armed force personnel…

प्रतिक्रिया
Permalink

SSLC

प्रतिक्रिया

Atalapur basa Kalyan bidar

नवी प्रतिक्रिया द्या

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.