Youtube Video
हायलाइट्स
- पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन.
- नियोक्त्यांना आर्थिक प्रोत्साहनामुळे नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या.
Customer Care
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेचा हेल्पलाईन क्रमांक : १८००१८०१८५०
- कामगार आणि रोजगार मंत्रालायचे संपर्क क्रमांक.
माहिती पुस्तक
योजनेचा सारांश | |
|---|---|
| योजनेचे नाव | पीएम विकसित भारत रोजगार योजना. |
| सुरवात वर्ष | ०१-०८-२०२५ |
| फायदे | कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही आर्थिक प्रोत्साहन लाभ. |
| लाभार्थी | पहिल्यांदाच काम करणारे कर्मचारी आणि नियोक्ते. |
| नोडल विभाग | कामगार आणि रोजगार मंत्रालय |
| सदस्यता | योजनेबाबत माहिती मिळवण्यासाठी येथे सदस्यता घ्या. |
| अर्ज करण्याची पद्धत | अर्ज फॉर्मद्वारे. |

योजनेचा परिचय: थोडक्यात आढावा
- अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी २०२४-२०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काम करणाऱ्या आणि नियोक्त्यांसाठी रोजगाराशी संबंधीत प्रोत्साहन योजना (इएलआय योजना) जाहीर केली.
- ही पंतप्रधानांच्या ५-योजनेच्या पॅकेजचा एक भाग आहे,ज्यामध्ये शीर्ष ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणारी “पीएम इंटर्नशिप योजना” देखील समाविष्ट आहे.
- केंद्र सरकारने ०१-०७-२०२५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इएलआय योजनेच्या सुरवातीला मान्यता दिली.
- इएलआय योजनेचे आता प्रधानमंत्री विकसित भारत योजना (पीएमवीबीआरवाय) असे नामकरण करण्यात आले.
- या योजनेचे उद्दिष्ट आहे :-
- नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी नियोक्त्यांना प्रोत्साहित करणे.
- पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे.
- कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) च्या सहकार्याने याची अंमलबजावणी केली जाईल.
- पीएमवीबीआरवाय मध्ये दोन घटक असतात:
- भाग अ: पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन.
- भाग ब: नियोक्त्यांना पाठिंबा.
- एक लाख रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन असलेल्या पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगाराचे किंवा १५००० रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल.
- नियोक्त्यांना अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करण्यासाठी मासिक प्रोत्साहन मिळेल.
- १०,००० रुपये/महिना पर्यंतचा पगार-पगाराच्या १०% किंवा कमाल रु.१०००/- महिना.
- पगार रु. १०००१ ते रु. २००००/-महिना-रु. २००० महिना.
- पगार रु. २०००१ ते रु. १०००००/-महिना-रु. ३००० महिना.
- कर्मचाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन आधार-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.
- नियोक्ता प्रोत्साहन त्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.
- प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ पहिल्यांदाच येणाऱ्या १.९२ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि २.६० कोटींहून अधिक नियोक्त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
- प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांसाठी लागू आहे.
- PMVBRY योजनेचे लाभ फक्त ०१-०८-२०२५ किंवा त्यानंतर झालेल्या भरतीसाठी लागू होतील.
कर्मचाऱ्यांसाठी योजनेचे फायदे:-
- केंद्र सरकार या योजनेअंतर्गत नवीन नोकरीवर असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देते.
- एका महिन्याच्या इपीएफ वेतनाईतके किंवा १५,००० रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन दोन टप्प्यात दिले जाते.
- पहिलं हफ्ता कर्मचाऱ्याने ६ महीने सतत सेवा पूर्ण केल्यानंतर दिला जातो.
- दूसरा हफ्ता १२ महिन्यांच्या सेवेनंतर आणि आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर दिला जातो.
- कर्मचाऱ्याचा मासिक पगार १,००,००० रुपयांपेक्षा कमी कमी असेल तरच हा लाभ लागू होतो.
नियोक्त्यांसाठी योजनेचे फायदे:-
- केंद्र सरकार नवीन रोजगार संधि निर्माण करण्यासाठी नियोक्त्यांना आर्थिक बक्षिसे देते.
- कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारावर नियोक्त्यांना मासिक प्रोत्साहन रक्कम रु. १००० ते रु. ३००० पर्यंत मिळू शकते.
- उत्पादन उध्योगातील कर्मचारी ४ वर्षापर्यंत प्रोत्साहन लाभासाठी पात्र आहेत.
- इतर सर्व क्षेत्रातील नियोक्ते २ वर्षाच्या कालावधीसाठी ही फायदे घेऊ शकतात.
- कर्मचाऱ्यांच्या इपीएफ वेतनानुसार प्रोत्साहन रक्कम निश्चित केली जाते,जसे की खाली नमूद केले आहे.
- १००००/महिना पर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी -प्रोत्साहन रक्कम पगाराच्या १०% किंवा रु. १०००/-महिना पर्यन्त आहे.
- १०००१ ते २००००/ महिना पर्यंतच्या पगारासाठी – निश्चित प्रोत्साहन रुपये २०००/महिना.
- २०००१ ते १०००००/ महिना पर्यंतच्या पगारासाठी – निश्चित प्रोत्साहन रुपये २०००/महीने.
कर्मचाऱ्यांसाठी पात्रता आवश्यकता
- फक्त पहिल्यांदा औपचारिक नोकरीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तिंनाच योजनेचा लाभ घेता येईल.
- कर्मचाऱ्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत(इपीएफओ)नोंदणी केलेली असते आवश्यक आहे.
- पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पगार १०००००/- रुपयांपेक्षा कमी असावा.
- कर्मचाऱ्याने नियोक्त्यासोबत किमान सहा महीने काम केलेले असावे.
नीयोक्त्यांसाठी पात्रता आवश्यकता
- प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे फायदे प्रत्येक उध्योगातील नीयोक्त्यांसाठी खुले आहेत.
- ५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांनी पात्र होण्यासाठी दरवर्षी किमान २ नवीन कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे.
- ५० पेक्षा जास्त व्यक्तिंना रोजगार देणाऱ्या संस्थांनी दर दरवर्षी किमान ५ नवीन कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे.
- फायद्यांसाठी पात्र होण्यासाठी,नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी किमान सहा महीने सेवा पूर्ण केली पाहिजे.
- भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार १०००००/- रुपयांपेक्षा जास्त नसावा.
कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
- कर्मचाऱ्याचा आधार ओळखीचा पुरावा.
- आधार कार्डशी जोडलेला बँक खाते क्रमांक.
- कर्मचाऱ्याचा पॅन तपशील.
- इपीएफओ ने दिलेला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन).
- नियुक्ती किंवा जॉइनिंग कन्फर्मेशन पत्र.
- सक्रिय मोबईल संपर्क क्रमांक.
- संपर्कासाठी वैयक्तिक ईमेल आयडी.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
नीयोक्त्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
- व्यवसाय संस्थेचा वैध जीएसटी किंवा सीआयएन क्रमांक.
- संस्थेचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (पीएएन).
- संस्थेशी संबंधीत सक्रिय बँक खात्याचा तपशील.
- कर कपात आणि संकलन खाते क्रमांक (टीएएन).
- इसीआर अहवाल.
कर्मचाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे टप्पे
- जेव्हा एखादी व्यक्ति पहिल्यांदा नोकरीत सामील होते,तेव्हा इपीएफओ त्यांना यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) जारी करते.
- एकवेळ वेतन लाभ किंवा जास्तीत जास्त १५०००/- रुपयांच्या प्रोत्साहणासाठी पात्र होण्यासाठी,कर्मचाऱ्याने त्यांचे यूएएन सक्रिय केले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्याने बँक खाते देखील त्यांच्या आधारशी जोडलेले असलेले पाहिजे.
- प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना/ इपीएफओ अंतर्गत आधीच नोंदणीकृत असलेल्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारिच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना/इपीएफओ अंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करणे आणि त्यांची यूएएन निर्मिती प्रक्रिया सुरू करणे ही नियोक्त्याची जबाबदारी आहे.
- नोंदणी झाल्यानंतर पहिल्यांदाच काम करणारे कामगार आपोआप पीएम विकसित भारत रोजगार योजनेच्या प्रोत्साहनांसाठी पात्र होतील.
- या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दोन वेगवेगळ्या टप्प्यात वितरित केले जातील.
- कर्मचाऱ्याने ६ महीने सतत सेवा पूर्ण केल्यानंतर पहिला हफ्ता जमा केला जाईल.
- दूसरा हफ्ता १२ महिन्यांच्या नोकरी आणि आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल.
- कर्मचाऱ्यांना त्यांचा १२ महिन्याचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वी हा आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी,कर्मचाऱ्यांनी त्यांच्या यूएएन आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरुन एपीएफओ पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे.
- लॉग इन केल्यानंतर,”माय डॅशबोर्ड” वर जा आणि शिक्षण विभागावर क्लिक कर.
- इएलआय सदस्यांसाठी आर्थिक साक्षरता हा पर्याय निवडा आणि नोंदणी पूर्ण करा.
- अभ्यासक्रमात प्लॅटफॉर्मवर प्रदान केलेले सर्व शैक्षनिक व्हिडिओ मोड्यूल पाहणे समविष्ट आहे.
- यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर,अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन तयार केले जाईल.
- हे प्रमाणपत्र मिळाल्याने कर्मचारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत दुसऱ्या हफ्त्यासाठी पात्र ठरतो.
नियोक्त्यांसाठी अर्ज करण्याचे टप्पे
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत मासिक प्रोत्साहनाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नियोक्त्यांना स्वतःची नोंदणी करण्याची गरज नाही.
- मात्र, त्यांना पॅन, जीएसटीआयएन, पॅन लिंकिंग यासारखी माहिती प्रदान करणे आणि मासिक ईसीआर (ECR) वेळेवर भरल्याची खात्री करणे बंधनकारक आहे.
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेचा अधिकृत पोर्टल आता कार्यान्वित आहे, ज्या माध्यमातून या योजनेशी संबंधित सर्व माहिती मिळवता येऊ शकते.
- PMVBRY योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील तपशील EPFO च्या वेबसाइटवर भरणे आवश्यक आहे :-
- कंपनी/संस्थेचे नाव
- पीएएन क्रमांक
- टीएएन क्रमांक
- जीएसटी ओळख क्रमांक
- बँकेचे नाव आणि शाखा
- आयएएफएससी नंबर
- खाते क्रमांक
- नियोक्त्यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या नवीन कर्मचाऱ्यांची माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.
- लाभांसाठी पात्र राहण्यासाठी संस्थेने वेळेवर मासिक इसीआर सादर करणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री विकशीत भारत रोजगार योजनेअंतर्गत,प्रोत्साहन रक्कम नोंदणीकृत नियोक्त्यांच्या पीएएन लिंक बँक खात्यात थेट हस्तांतरीत केली जाईल.
संबंधीत दुवे
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेची अधिकृत वेबसाइट.
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेचा नियोक्ता लॉगिन.
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेचा कर्मचारी लॉगिन.
- पीएम विकसित भारत रोजगार योजना मार्गदर्शक तत्वे.
- कामगार आणि रोजगार मंत्रालय.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.
संपर्क माहिती
- पीएम विकसित भारत रोजगार योजनेचा हेल्पलाईन क्रमांक : १८००१८०१८५०
- कामगार आणि रोजगार मंत्रालायचे संपर्क क्रमांक.
Ministry
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
| Person Type | Govt |
|---|---|
Stay Updated
×
Comments
Class 11th arts
I am poor
15000
Good
Job
I m from West Bengal Kolkata 12 pass I'm jobless
नवी प्रतिक्रिया द्या