प्रगती शिष्यवृत्ती योजना

author
जमा करणार shahrukh on Tue, 18/06/2024 - 15:26
केंद्र सरकार CM
Scheme Open
Pragati Scholarship Scheme Logo
हायलाइट्स
  • दर वर्षी रु. ५०,०००/- शिष्यवृत्ती.
  • तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ३ वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ३ वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल.
Customer Care
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना हेल्प डेस्क ईमेल :- pragati@aicte-india.org.
  • एआयसीटीई हेल्प डेस्क :- ०११-२६१३१४९७.
  • एआयसीटीई हेल्प डेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्प डेस्क नंबर :- ०१२०—६६१९५४०.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्प डेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव प्रगती शिष्यवृत्ती योजना.
शिष्यवृत्तीची संख्या
  • ५,००० जागा तांत्रिक पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी.
  • ५,००० जागा तांत्रिक डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी.
शिष्यवृत्तीची रक्कम रु. ५०,०००/- दर वर्षी.
शिष्यवृत्तीचा कालावधी
  • जास्तीत जास्त ४ वर्षे तांत्रिक पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी.
  • जास्तीत जास्त ३ वर्षे तांत्रिक डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी.
पात्रता प्रत्येक कुटुंबातील २ मुली पात्र आहेत.
नोडल विभाग अखिल भारतीय परिषद तांत्रिक शिक्षण.
नोडल मंत्रालय शिक्षण मंत्रालय
सबसक्रीपशन योजनेबद्दल अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत प्रगती शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाइन अर्जाद्वारे.

परिचय

  • मुलींना त्यांचे मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकार अनेक शिष्यवृत्ती योजना चालवते.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना ही देखील मुलींसाठी असलेली शैक्षणिक सुधारणा शिष्यवृत्ती योजनांपैकी एक आहे.
  • अखिल भारतीय परिषद तांत्रिक शिक्षण ही या योजनेची अमलबजावणी करणारी संस्था आहे.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना आर्थिक ओझ्याचा विचार न करता उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
  • ही योजना ‘मुली विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना’ या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व पात्र विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून वार्षिक आर्थिक मदत सहाय्य प्रदान केले जाईल.
  • दर वर्षी रु. ५०,०००/- शिष्यवृत्ती ही महाविद्यालयाची फी, पुस्तके खरेदी करण्यासाठी, संगणक आणि इतर अभ्यासाच्या खर्चासाठी दिली जाईल.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी १०,००० मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी वार्षिक शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक सहाय्य मिळेल.
  • ५,००० जागा पदवी विद्यार्थ्यांसाठी आणि ५,००० जागा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आहेत.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फक्त त्या मुली पात्र आहेत ज्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रम किंवा तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेत आहेत.
  • तांत्रिक पदवीच्या मुलींना जास्तीत जास्त ४ वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळेल.
  • आणि तांत्रिक डिप्लोमाच्या मुलींना जास्तीत जास्त ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळेल.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध असलेला ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्ती योनेअंतर्गत वार्षिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१-०१-२०२४ आहे.
  • विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

फायदे

  • मुलींना एआयसीटीई च्या प्रगती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत वार्षिक शिष्यवृत्ती म्हणून खाली नमूद केलेली आर्थिक मदत मिळेल :-
    • दर वर्षी रु. ५०,०००/- शिष्यवृत्ती.
    • तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ३ वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल.
    • तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ३ वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल.

पात्रता अटी

  • फक्त विद्यार्थिनीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • एका कुटुंबातील दोन मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • विद्यार्थिनीचे वार्षिक उत्पन्न हे वर्षाला रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • तांत्रिक पदवी अभ्यासक्रम किंवा तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रम यामध्ये प्रवेश घेणार्‍या मुली पात्र आहेत.
  • पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी किंवा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी (लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश) पात्र आहेत.
  • विद्यार्थिनीची शैक्षणिक संस्था एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त असावी.
  • विद्यार्थिनी कोणत्याही केंद्र/ राज्य एआयसीटीई प्रायोजित शिष्यवृत्तीची लाभार्थी नसावी.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा करावा

  • पात्र विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • प्रगती शिष्यवृत्ती  योजनेचा ऑनलाईन अर्ज हा राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध आहे.
  • विद्यार्थिनींना प्रथम नवीन नोंदणी वर क्लिक करून स्वत:ची नोंदणी करावी लागेल.
  • प्रगती शिष्यवृत्तीच्या नोंदणी फॉर्म यामध्ये खालील तपशील भरा :-
    • अधिवास राज्य.
    • शिष्यवृत्तीची कॅटेगरी प्रीमॅट्रिक असो किंवा पोस्ट मॅट्रिक असो.
    • विद्यार्थिनीचे नाव.
    • योजनेचा प्रकार.
    • जन्म दिनांक.
    • लिंग.
    • मोबाइल नंबर.
    • ईमेल आयडी.
    • बँक आयएफसी कोड.
    • बँक अकाऊंट नंबर.
    • आधार नंबर.
  • वरील दिलेला तपशील भरल्यानंतर नोंदणी वर क्लिक करा
  • तुमचा प्रगती शिष्यवृत्तीचा प्राप्त झालेला आयडी आणि पासवर्डसह सबमिट करण्यासाठी लॉगइन करा.
  • योजनेच्या यादीतून प्रगती शिष्यवृत्ती निवडा सर्व तपशील भरा, सर्व कागदपत्रे अपलोड करा आणी अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • प्रगती शिष्यवृत्तीचा अर्ज आणि कागदपत्रांची छाननी विद्यार्थिनी जिथे शिकत आहे त्या संस्थेद्वारे केली जाईल. तसेच विद्यार्थिनी राहते त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या तंत्रशिक्षण विभागाद्वारे देखील छाननी केली जाईल, आणि त्यानंतर निवडलेल्या विद्यार्थिनीची यादी एआयसीटीई पोर्टल वर उपलब्ध होईल.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना नूतणीकरणाच्या अधीन आहे, त्यामुळे विद्यार्थिनींना दरवर्षी त्यांच्या अर्जाचे नूतनीकरण करावे लागेल.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेचे २०२३-२०२४ वर्षासाठीचे अर्ज ३१-०१-२०२४ पर्यंत लाईव्ह आहेत.
  • पात्र विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक शिष्यवृत्तीसाठी ३१ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

तांत्रिक पदवीच्या अभ्यासक्रमासाठी

  • प्रगती शिष्यवृत्तीसाठी निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. म्हणजेच १२ वी किंवा समतुल्य परीक्षा.
  • पात्रता गुणांच्या आधारे टाय झाल्यास, टाय तोडण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबली जाईल :-
    • ज्या विद्यार्थिनींना १०वी मध्ये जास्त गुण असतील त्यांना उच्च स्थान दिले जाईल.
    • जर १० वीच्या गुणांवरून टाय ब्रेक झाले नाहीत तर त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीला उच्च स्थान दिले जाईल.

तांत्रिक डिप्लोमा लेव्हलच्या अभ्यासक्रमासाठी

  • तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेच्या गुणवत्तेद्वारे प्रगती शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींची निवड केली जाईल.
  • डिप्लोमा कोर्ससाठी पात्रता परीक्षा इयत्ता १०वी आहे.
  • पात्रता गुणांवर टाय झाल्यास, टाय तोडण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबली जाईल :-
    • जास्त वयाच्या विद्यार्थिनीला उच्च स्थान दिले जाईल.
    • जर वयाने टाय सुटले नाही तर कमी वार्षिक उत्पन्न असलें विद्यार्थिनीला उच्च स्थान दिले जाईल.

योजनेचे वैशिष्ट

  • प्रगती शिष्यवृत्ती योजना ही वर्षातून एकदाच उपलब्ध असते.
  • शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे.
  • यादरम्यान जर विद्यार्थिनीने अभ्यासक्रम सोडला तर ती पुढील शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
  • एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
  • विद्यार्थिनी कोणत्याही केंद्र/राज्य/एआयसीटीई शिष्यवृत्तीची लाभार्थी नसावी.
  • पात्र असलेल्या विद्यार्थिनींसाठी दरवर्षी १०,०००/-शिष्यवृत्तीच्या जागा उपलब्ध असतात.
  • त्या १०,०००/- जागांपैकी ५,०००/-जागा ह्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी व ५,०००/- जागा ह्या तांत्रिक डिप्लोमा पदवी अभ्यासक्रमासाठी आहेत.
  • विद्यार्थिनी या योजनेचा लाभ त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या किंवा दुसीऱ्या वर्षातच घेऊ शकतात.
  • शिष्यावरूतीची रक्कम विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी त्यांना पेमेंट दिले जाईल :-
    • कॉलेज फी.
    • स्टेशनरी.
    • पुस्तके.
    • साहित्य.
    • संगणक खरेदीसाठी.
    • डेकस्टॉ.
    • सॉफ्टवेअर खरेदीसाठी.इत्यादि.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वासतिगृहसाठी किंवा वैद्यकीय फीसाठी कोणतेही अतिरिक्त अनुदान दिलेजाणार नाही.
  • निवड पद्धती पूर्णपणे गुणवत्तेवर असेल.
  • तांत्रिक अभ्यासक्रम व तांत्रिक डिप्लोमा शिकणाऱ्य मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
  • निवडलेल्या विद्यार्थिनींची यादी ही एआयसीटीई वेब पोर्टल वर उपलब्ध असेल.
  • सीजीपीए चे टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी सीजीपीए ला ९.५ ने गुणाकार करण्याची पद्धत वापरली जाते.(सीजीपीए x ९.५).
  • शिष्यवृत्तीची रक्कम ही उमेदवारला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते.
  • जर विद्यार्थिनी पुढच्या वर्गात पदोन्नती देऊ शकली नाही तर शिष्यवृत्ती जप्त केली जाते.
  • शिष्यवृत्ती अर्जाचे नूतनीकरण करतांना पदोन्नती प्रमाणपत्र अपलोड कर्नर आवश्यक आहे.
  • शिष्यवृत्तीचा लाभ घेतांना कोणत्याही कागदपत्रे पुरावे जोडण्याचे काम नाही.
  • उमेदवारला दिलेले आरक्षण भरतसारकारच्या नियमानुसार आहे.

राज्यानुसार शिष्यवृत्ती जागांचे वितरण

  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्ती जागांचे राज्यानुसार वितरण पुढीलप्रमाणे आहे :-
    राज्य/ यूटी शिष्यवृत्तीची संख्या पदवी अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीची संख्या डिप्लोमा अभ्यासक्रमात
    आंध्र प्रदेश ५६६ ३१८
    बिहार ५२ ८४
    चांदीगड (यूटी) ५० ५०
    छत्तीसगाढ ६२ ६२
    दिल्ली (एनटीसी) ५० ५०
    गोवा ५० ५०
    गुजरात २१९ २८४
    हरियाणा १३४ १९१
    हिमाचल प्रदेश ५० ५०
    झारखंड ५० ६७
    कर्नाटक ३९८ ३६५
    केरळ १९६ १०९
    मध्य प्रदेश २८५ १९२
    महाराष्ट्र ५५३ ६२४
    ऑडिसा १३४ २०५
    पाँडिचेरी (यूटी) ५० ५०
    पंजाब १२४ २०८
    राजस्थान १५२ १७०
    तामिळनाडू ८०० ७००
    तेलंगणा ४२४ २०६
    उत्तर प्रदेश ४२२ ७००
    उत्तराखंड ५० ८१
    वेस्ट बंगाल १२९ १८४
    टोटल ५,००० ५,०००

ज्या राज्यांचे सर्व पात्र अर्ज स्वीकारले जातील त्यांची यादी

  • निश्चित ५,००० जागांव्यतिरिक्त, प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, शिष्यवृत्ती खालील तकटींमद्धे नमूद केलेल्या राज्य आणि केंद्रशासीत परदेशातून अर्ज करणाऱ्या सर्व पात्र मुलींना दिली जाईल :-
    राज्य/यूटी शिष्यवृत्तीची संख्या
    अंदमान आणि निकोबार बेट (यूटी) सर्व पात्र विद्यार्थिनी
    दादरा व नगर हवेली आणि दमन व दिव(यूटी)
    जम्मू व काश्मीर (यूटी)
    लडाख (यूटी)
    लक्ष्यद्वीप (यूटी)
    अरुणाचल प्रदेश
    आसाम
    मणीपुर
    मेघालय
    मिझोराम
    नागालँड
    सिक्कीम
    त्रिपुरा

महत्वाचे फॉर्म

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • प्रगती शिष्यवृत्ती योजना हेल्पलाइन नंबर :- ०११-२९५८१११८.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजना हेल्प डेस्क ईमेल :- pragati@aicte-india.org.
  • एआयसीटीई हेल्प डेस्क :- ०११-२६१३१४९७.
  • एआयसीटीई हेल्प डेस्क ईमेल :- ms@aicte-india.org.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्प डेस्क नंबर :- ०१२०—६६१९५४०.
  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हेल्प डेस्क ईमेल :- helpdesk@nsp.gov.in.
  • विद्यार्थी विकास केंद्र (एसटीडीसी),
    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद
    वसंत कुंज,नेल्सन मंडेला मार्ग,
    नवी दिल्ली- ११००७०.

Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:

Feel free to click on the link and join the discussion!

This forum is a great place to:

  • Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
  • Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
  • Connect with others: Engage with the community and learn from others.

I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.

Comments

Plz provide the list of…

प्रतिक्रिया

is mbbs covered?

प्रतिक्रिया

nice information

प्रतिक्रिया

Why instead of have a big…

प्रतिक्रिया

This scheme help me alot for…

प्रतिक्रिया

Low seat for Jharkhand too

प्रतिक्रिया

amount is credited ver late

प्रतिक्रिया

age limit nhi hai koi?

प्रतिक्रिया

is phd. include?

प्रतिक्रिया

give a reminder when it…

प्रतिक्रिया

i want to change my account…

प्रतिक्रिया

i recently passed 12th. i…

प्रतिक्रिया

Is there any specific amount…

प्रतिक्रिया

Helpdesk numbers are not…

प्रतिक्रिया

is this applicable for ITI…

प्रतिक्रिया

when will the last date for…

प्रतिक्रिया

is there a need to renew my…

प्रतिक्रिया

i got received my…

प्रतिक्रिया

To the govtschemes.in…

प्रतिक्रिया

To the govtschemes.in webmaster, Your posts are always well-written and easy to understand.

i switch college within same…

प्रतिक्रिया

i switch college within same university. am i eligible for pragati scholarship scheme

please credit this year…

Your Name
avanti
प्रतिक्रिया

please credit this year pragati scholarship scheme

pragati scholarship amount…

Your Name
gargi
प्रतिक्रिया

pragati scholarship amount not come

Hi I am an renewal student…

प्रतिक्रिया

Hi I am an renewal student of nsp scholarship Pragati but i am. Confused that I have to upload new domicile certificate and income certificate as it was made on date 28 April 2023

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.