प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय)

author
जमा करणार shahrukh on Thu, 06/03/2025 - 14:09
केंद्र सरकार CM
Scheme Open
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Information Logo
हायलाइट्स
  • वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण रु. १,००,०००/- पासून ते रु. २,००,०००/-.
  • प्रिमियमची रक्कम खूपच कमी आहे म्हणजे फक्त रु. २०/- दर वर्षी.
Customer Care
  • राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक :-
    • १८००१८०११११.
    • १८००११०००१.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय)
लॉंच दिनांक १ जून २०१५
योजनेचा प्रकार अपघाती विमा योजना
नोडल मंत्रालय आर्थिक सेवा विभाग.
अधिकृत वेबसाइट जन-धन से जन सुरक्षा पोर्टल.
अपघाती विमा रु. १,००,०००/- ते रु. २,००,०००/-.
भरावे लागणारे प्रीमियम. रु.२०/-दर वर्षी.
विमा कालावधी
  • १२ महीने (दरवर्षी १ जून ३१ मे पर्यंत)
  • ही एक वर्षाची अपघाती विमा योजना आहे ज्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते.
पात्रता १८ ते ७० वयोगटातील प्रयत्तेक भारतीय नागरिक.
अर्ज करण्याची पद्धत बँकाद्वारे ऑफलाइन/ ऑनलाइन मोड उपलब्ध.

परिचय

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी अपघाती विमा योजना आहे.
  • वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • हे १ जून २०१५ रोजी लॉंच केले गेले.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विमा नसलेल्या लोकांना वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण प्रदान करणे.
  • या योजनेला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते उदा :- "पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजना” किंवा “पंतप्रधान अपघात विमा योजना”.
  • हे एखाद्या व्यक्तीसाठी एक वर्षाचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण आहे.
  • विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा तिला/ त्याला डोळा/ हात/ पायांचे आंशिक/ कायमचे अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य दिले जाईल.
  • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु. २,००,०००/- दिले जातील.
  • कायमचे अपंगत्व असल्यास रु. २,००,०००/- ची आर्थिक मदत तर, अपघातामुळे आंशिक अपंगत्व आल्यास रु. १,००,०००/- प्रदान केले जातील.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वैयक्तिक अपघाती संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला प्रती वर्ष प्रीमियम रु. २०/- भरावे लागतील.
  • ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या (पीएसजीआयसीएस्) आणि बँकांच्या सहकार्याने इतर सामान्य विमा कंपन्यांद्वारे  ऑफर केली जाते.
  • कोणत्याही विमा कंपनीला त्यांच्या ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे हे संबंधित बँकांवर अवलंबून आहे.
  • पात्र लाभार्थी बँकेला भेट देऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत स्वत:ची नोंदणी करू शकतात.
  • बँकेत उपस्थित अधिकारी लाभार्थी व्यक्तीची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत नोंदणी करतील.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत लाभार्थीची नोंदणी करण्यासाठी ते ऑनलाइन अर्ज प्रक्रिया किंवा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया निवडतात की नाही हे बँकेवर अवलंबून आहे.

फायदे

  • वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण रु. १,००,०००/- पासून ते रु. २,००,०००/-.
  • प्रिमियमची रक्कम खूपच कमी आहे म्हणजे फक्त रु. २०/- दर वर्षी.
  • अपघातामुळे झालेला मृत्यू किंवा अपघातामुळे व्यक्तीचे अंशीक/ कायमचे अपंगत्व कव्हर करते.
  • संमतीवर खातेधारकाच्या बँक खात्यातून प्रिमियम स्वयं-डेबिट केला जातो.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य आहेत :-
    लाभाची स्थिती विमाची रक्कम
    पॉलिसी धारकाचा मृत्यू रु. २,००,०००/-.
    • कोणतेही पूर्ण अपंगत्व :-
      • दोन्ही डोळ्यांचे संपूर्ण आणि अपूरणीय नुकसान.
      • दोन्ही हातांचा किंवा दोन्ही पायांचा वापर न होणे.
      • एका डोळ्याची दृष्टी गामावणे.
      • हाताचा किंवा पायाचा वापर न होणे.
    रु. २,००,०००/-.
    • आंशिक अपंगत्व :-
      • एका डोळ्याच्या दृष्टीचे एकूण आणि कधीही भरून न येणारे नुकसान.
      • एका हाताचा किंवा पायाचा वापर न होणे.
    रु. १,००,०००/-.

पात्रता निकष

  • १८ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिक प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहे.
  • लाभार्थ्याचे जनधन बँक खाते किंवा कोणत्याही बँकेत बचत खाते असावे.
  • बँक खाते व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असावे.

योजनेचे वैशिष्ट्ये

  • ही सर्व भारतीयांसाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे परंतु विशेषत: विमा नसलेल्या गरीब आणि विशेषाधिकारप्राप्त व्यक्तींवर लक्ष केंद्रित करते.
  • लाइफ इन्शुरन्स कव्हर फक्त १ वर्षासाठी आहे जे दरवर्षी १ जून ते ३१ मे पर्यंत सुरू होते.
  • योजनेची वार्षिक नूतनीकरण तारीख प्रत्येक आगामी वर्षात १ जून आहे.
  • पॉलिसीधारकाच्या संमतीवर प्रिमियमचि रक्कम म्हणजे रु. २०/- एक हपट्यात पॉलिसीधारकाच्या खात्यातून ऑटो-डेबिट मोडद्वारे कापले जातिल.
  • योजनेतून कधीही बाहेर पडलेली कोणतीही व्यक्ति नजीकच्या भविष्यात या योजनेत पुन्हा सामील होऊ शकते.
  • वयाची ७० वर्षे ओलांडलेली व्यक्ति प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत स्वत:ची नोंदणी करू शकत नाही.
  • व्यक्तीचे आधार कार्ड त्याच्या/ तिच्या बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे.
  • वर्षातून कधीही बँकेच्या शाखेत अर्ज भरून लाभार्थी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत स्वत:ची नोंदणी करू शकतात.
  • काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही दिली आहे.
  • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला रु. २ लाखची रक्कम मिळू शकते.
  • जर कोणाही व्यक्तीची अनेक बँक खाती असतील तर अशा स्थितीत तो/ ती स्वत:च्या एक बँक खत्यातून योजनेचा लाभ घेऊ शकतो.

अटी ज्यामध्ये कोणताही दावा देय राहणार नाही

  • लाभार्थी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती विमा रकमेसाठी दावा करू शकत नाही जर तो खाली नमूद केलेल्या कोणत्याही परिस्थितीच्या कक्षेत येत असेल तर :-
    • जेव्हा लाभार्थी वय 70 वर्षे पूर्ण करतो.
    • प्रीमियम कपातीसाठी बँक खात्यात अपुरी शिल्लक.
    • लाभार्थीद्वारे बँक खाते बंद करणे.
    • जेव्हा कोणतीही व्यक्ती एकाधिक बँक खात्यांद्वारे एकाच योजनेचा लाभ घेते.

अर्ज फॉर्म

दावा फॉर्म

महत्वाच्या लिंक्स

राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक

  • राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक :-
    • १८००१८०११११.
    • १८००११०००१.
राज्यानुसार जनसुरक्षा टोल फ्री क्रमांक
राज्याचे नाव बँकेच्या संयोजकाचे नाव टोल फ्री क्रमांक
आंध्र प्रदेश आंध्र बँक १८००४२५८५२५
अंदमान आणि निकोबर बेट स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५४५४५
अरुणाचल प्रदेश स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६१६
आसाम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३७५६
बिहार स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५६१९५
चंदीगड पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
छत्तीसगड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००२३३४३५८
दादर आणि नगर हवेली देना बँक १८००२२५८८५
दमन आणि दिव देना बँक १८००२२५८८५
दिल्ली ओर्यंटल बँक ऑफ कॉमर्स १८००१८००१२४
गोवा स्टेट बँक ऑफ इंडिया १८००२३३३२०२
गुजरात देना बँक १८००२२५८८५
हरयाणा पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
हिमाचल प्रदेश यूको बँक १८००१८०८०५३
झारखंड बँक ऑफ इंडिया १८००३४५६५७६
कर्नाटक सीनडिकेट बँक एसएलबीसी १८००४२५९७७७७
केरळ क्यानरा बँक १८००४२५११२२२
लक्षद्वीप सीनडिकेट बँक १८००४२५९७७७७
मध्य प्रदेश सेंट्रल बँक ऑफ इंडिया १८००२३३४०३५
महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र १८००१०२२६३६
मणीपुर स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३८५८
मेघालय स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६५८
मिझोरम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६६०
नागालँड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३७०८
ओडिसा यूको बँक १८००३४५६५५१
पुडुचेरी इंडियन बँक १८००४२५०००००
पंजाब पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
राजस्थान बँक ऑफ बरोडा १८००१८०६५४६
सिक्किम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३२५६
तेलंगणा स्टेट बँक ऑफ हैदराबाद १८००४२५८९३३
तमिळनाडू इंडियन ओवर्सीस बँक १८००४२५४४१५
उत्तरप्रदेश बँक ऑफ बरोडा १८००१०२४४५५
१८००२२३३४४
उत्तराखंड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००१८०४१६७
पश्चिंम बंगाल आणि त्रिपुरा यूनायटेड बँक ऑफ इंडिया १८००३४५३३४३

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: विमा

Sno CM Scheme Govt
1 प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय) केंद्र सरकार

Comments

Permalink

bank wale bole ye jaruri hai…

प्रतिक्रिया

In reply to by rajnish (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Zaruri nhi hai ye voluntary…

प्रतिक्रिया
Permalink

r u kidding sach me 12 rs…

प्रतिक्रिया
Permalink

which corporation provide…

प्रतिक्रिया

In reply to by akhil (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Dear govtschemes.in…

प्रतिक्रिया

Dear govtschemes.in webmaster, Thanks for the well-researched and well-written post!

Permalink

koi online portal hai iske…

प्रतिक्रिया
Permalink

हल्दुपाडा

प्रतिक्रिया

मकान

Permalink

Hindi

प्रतिक्रिया

Sir me single hu or mujhe pese ki zarurat hai or me job bhi karta hu or usse itna ni ho pata ki me pese jodh saku sir me ane wale 5sal me sadi karunga.

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.