महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम

author
जमा करणार shahrukh on Tue, 15/04/2025 - 17:57
महाराष्ट्र CM
Scheme Open
महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम
हायलाइट्स
  • ग्रेड - ए अधिकारी समतुल्य पद प्रदान केले जाईल.
  • मासिक वेतन रु 56,100/- प्रती महिना.
  • प्रवास आणि एटर खरच्यासाठी रु 5,400/- प्रती महिना स्वतंत्रपणे दिले जातील.
  • अपघाती विमा संरक्षण मिळेल.
  • आयआयटी मुंबई किंवा आयआयटी नागपूरचे विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • महाराष्ट्र सरकारकडून फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
  • Customer Care
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हेल्पलाईन नंबर :- ०८४११९६०००५.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हेल्पडेस्क ईमेल :- cmfellowship-mah@gov.in.
    योजनेचा आढावा
    योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम.
    लॉंच केलेले वर्ष २०१५
    फायदे
    • तरुणांना महाराष्ट्र सारकरसोबत काम करण्याची संधि मिळेल.
    • फेलोशिप दरम्यान रु 56,100/- स्टायपेंड प्रदान केले जातील.
    • रु 5,400 प्रवास खर्च म्हणून दिले जातील.
    • ८ दिवसांची राज्य मिळेल.
    • फेलोशिप प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केले जातील.
    लाभार्थी महाराष्ट्रातील तरुण.
    इंटर्नशिपचा कालावधी  १ वर्ष.
    नोडल विभाग महाराष्ट्राचे अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय आणि नियोजन विभाग.
    सब्सक्रिप्शन कार्यक्रम अपडेट मिळविण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
    अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ऑनलाइन अर्ज याद्वारे करू शकतो.

    योजनेची माहिती

    • भारतात बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे.
    • भारत सरकार तसेच राज्य सरकार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
    • महाराष्ट्र सरकारने तरुणांना अल्पकालीन रोजगार देऊन त्यांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
    • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवनात मोठी भूमिका बजावत आहे.
    • ही कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने सन २०१५ मध्ये सुरू केली.
    • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे युवकांचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना महाराष्ट्र सरकारसोबत जवळून काम करण्याची संधी देऊन त्यांच्या कौशल्य जोपासणे हा आहे.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमंतर्गत निवडक तरुणांना शासकीय विभागात १२ महिन्यांची फेलोशिप दिली जाईल.
    • फेलोशिपच्या कालावधीत फेलोंना ग्रेड - ए ऑफिसरच्या समान पद मिळेल.
    • त्याशिवाय निवडलेल्या फेलोना खाली नमूद केलेले फायदे आणि लाभ दिले जातील:-
      • प्रति महिना रु. 56,100/- स्टायपेंड.
      • प्रवास आणि इतर खर्चासाठी दारमहिन्याला अतिरिक्त रु. 5,400/- दिलेजातील.
      • १२ महिन्यांचे अपघाती विमा संरक्षण.
      • ८ दिवसांची प्रासंगिक रजा मिळेल.
      • आयआयआयटी नागपूर किंवा आयआयटी मुंबईकडून विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
      • महाराष्ट्र सरकारचे फेलोशिप प्रमाणपत्र.
    • एकदा अर्जदाराने फेलोशिप पूर्ण केली की, फेलोशिपचा अनुभव त्यांना इतर ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताना इतर उमेदवारांवर वरचढ ठरेल.
    • तात्पुरत्या स्वरूपात फेलोंना अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत ईमेल आयडी देखील प्रदान केला जाईल.
    • अर्जदारासाठी १ वर्षाचा पूर्ण वेळेचा अनुभव अनिवार्य आहे.
    • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमंतर्गत पूर्णवेळ इंटर्नशिप, आर्टिकल शिप, अप्रेंटिसशिप मधले प्रोफेशनल कोर्स किंवा पूर्णवेळ स्वयंरोजगार आणि उद्योजकता हा अनुभव मानला जाईल.
    • अर्जदाराला मराठी भाषा अवगत असावी आणि तसेच वाचता, लिहिता आणि बोलता यावे.
    • इंग्रजी आणि हिंदीचे ज्ञानही आवश्यक आहे.
    • अर्जदाराची निवड महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमंतर्गत फेलोशिपसाठी ऑनलाइन परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
    • पात्र अर्जदार ऑनलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.
    • महाराष्ट्र सरकार 2025–2026 या वर्षासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या अर्ज प्रक्रियेची सुरूवात करणार आहे.
    • महाराष्ट्र सरकारने लाभार्थ्यांसाठी CM फेलोशिप 2025 अपडेटसाठी लिंक जारी केली आहे.
    • स्वतःची नोंदणी करा आणि महाराष्ट्र सरकारकडून थेट अद्ययावत माहिती प्राप्त करा.

    योजनेचे फायदे

    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना खाली दिलेले फायदे मिळतात :-
      • ग्रेड - ए अधिकारी समतुल्य पद प्रदान केले जाईल.
      • मासिक वेतन रु 56,100/- प्रती महिना.
      • प्रवास आणि एटर खरच्यासाठी रु 5,400/- प्रती महिना स्वतंत्रपणे दिले जातील.
      • अपघाती विमा संरक्षण मिळेल.
      • आयआयटी मुंबई किंवा आयआयटी नागपूरचे विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र देण्यात येईल.
      • महाराष्ट्र सरकारकडून फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
      • फेलोशिपच्या कालावधीत 8 दिवसांची रजा मिळेल.

    ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम आणि रचना

    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमंतर्गत फेलोची प्राथमिक निवड ऑनलाइन चाचणीवर आधारित असेल.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या ऑनलाईन परीक्षेची रचना पुढीलप्रमाणे आहे :-
      विषय प्रश्नांची संख्या
      सामान्य ज्ञान ५०
      तर्क १०
      इंग्रजी भाषा १०
      मराठी भाषा
      माहिती तंत्रज्ञान १०
      क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड १५
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :-
      विषय अभ्यासक्रम
      सामान्य ज्ञान
      • चालू घडामोडी.
      • सामान्य ज्ञान.
      • सामाजिक प्रश्न.
      • भारत आणि महाराष्ट्राचे अर्थकारण.
      तर्क
      • तर्क क्षमता.
      इंग्रजी भाषा
      • वाक्य रचना
      • व्याकरण
      मराठी भाषा
      • व्याकरण.
      • रचना.
      माहिती तंत्रज्ञान
      • विंडोज ७.
      • एमएस ऑफिस २०१०.
      • इंटरनेट.
      क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड।
      • डेटा इंटरप्रिटेशन.
      • अंकगणित.
      • बीजगणित.
      • मूलभूत भूमिती.
    • ऑनलाइन परीक्षेचे एकूण गुण 100 आहेत.
    • परीक्षेची एकूण वेळ 60 मिनिटे आहे.
    • प्रथम टप्प्यातील परीक्षेनंतर एकूण 210 उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड केली जाईल.
    • पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांना हिंदी, इंग्रजी किंवा मराठीपैकी कोणत्याही भाषेत 3 निबंध लिहावे लागतील.
    • निबंधांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
    • मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अंतिमरित्या निवडले जाईल.

    पात्रता

    • अर्जदार हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असावा.
    • अर्जदाराचे वय २१ वर्षे ते २६ वर्षादरम्यान असावे.
    • अर्जदाराल किमान १ वर्षाचा अनुभव असावा.
    • अर्जदार ६०% गुणांसह किमान पदवी उत्तीर्ण असावा.
    • अर्जदाराचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रभुत्व असावे.

    आवश्यक कागदपत्रे

    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
      • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
      • दहावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
      • बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
      • गुणपत्रिका आणि पदवीची पदवी.
      • गुणपत्रिका आणि पदव्युत्तर पदवी. (असल्यास)
      • मार्कशीट आणि प्रोफेशनल कोर्सची पदवी. (असल्यास)
      • डिप्लोमा सर्टिफिकेट. (असल्यास)
      • अनुभव पत्र.
      • स्कॅन केलेले फोटोग्राफ आणि स्वाक्षरी.
      • मोबाईल नंबर.

    अर्ज कसा करावा

    • पात्र अर्जदार ऑनलाईन अर्ज भरून शासकीय फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.
    • ऑनलाइन अर्ज हा महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पोर्टल यावर उपलब्ध आहे.
    • अर्जदाराला मूलभूत तपशील भरून प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
    • नोंदणीनंतर, पुढे जाण्यासाठी साइन इन वर क्लिक करा.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ऑनलाइन अर्जामध्ये खालील तपशील क्रमवार भरा :-
      • वैयक्तिक माहिती.
      • संपर्क माहिती.
      • शैक्षणिक माहिती.
      • कामाच्या अनुभवाचे तपशील.
      • प्राधान्याची निवड.
    • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर अर्ज फी भरण्यासाठी पुढे जा.
    • रु ५००/- अर्ज फीज भरा.
    • पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढावी.
    • प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करावी.
    • फेलोशिपसाठी अर्जदाराची निवड ऑनलाइन प्रवेश परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

    महत्वाच्या लिंक्स

    संपर्काची माहिती

    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हेल्पलाईन नंबर :- ०८४११९६०००५.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हेल्पडेस्क ईमेल :- cmfellowship-mah@gov.in.

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 काय आहे?
      - महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ही एक 12 महिन्यांची फेलोशिप आहे जी राज्यातील तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये थेट काम करण्याची संधी देते आणि त्यातून प्रत्यक्ष प्रशासनिक अनुभव मिळतो.
    • या फेलोशिप कार्यक्रमासाठी कोण अर्ज करू शकतात?
      - 21 ते 26 वर्षे वयोगटातील महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आणि किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले, तसेच पदवीत किमान 60% गुण मिळवलेले उमेदवार अर्ज करू शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
    • निवड झालेल्या फेलोना कोणते लाभ मिळतात?
      - निवड झालेल्या फेलोना ₹56,100 मासिक मानधन, प्रवास आणि इतर खर्चांसाठी ₹5,400 अतिरिक्त मदत, अपघात विमा, 8 दिवसांची रजा, आणि IIT मुंबईकडून प्रमाणपत्र मिळते.
    • या फेलोशिपसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
      - निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन प्रवेश परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखत यांचा समावेश आहे. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना फेलोशिप दिली जाईल.
    • ऑनलाइन प्रवेश परीक्षेची रचना काय आहे?
      - परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतात जे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, माहिती तंत्रज्ञान आणि गणितीय क्षमतेशी संबंधित असतात. 210 सर्वोच्च गुण प्राप्त करणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी निवडले जातात.
      एकूण परीक्षेचा कालावधी 60 मिनिटांचा असतो.
    • अर्ज करण्यासाठी पूर्वअनुभव आवश्यक आहे का?
      - होय, अर्जदाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ अनुभव असणे आवश्यक आहे. इंटर्नशिप, आर्टिकलशिप, स्वरोजगार किंवा उद्योजकतेचाही अनुभव ग्राह्य धरला जाईल.
    • दरवर्षी किती फेलोची निवड केली जाते?
      - दरवर्षी एकूण 60 फेलोची निवड या कार्यक्रमासाठी केली जाते.
    • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज कसा करावा?
      - पात्र उमेदवारांना अर्थ व सांख्यिकी संचालनालय पोर्टलवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा लागेल, नोंदणी करावी लागेल, फॉर्म पूर्ण करावा लागेल आणि ₹500 अर्ज शुल्क भरावे लागेल.
    • अर्ज करताना कोणते कागदपत्र आवश्यक असतात?
      - उमेदवारांनी महाराष्ट्राचा रहिवास पुरावा, शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, स्कॅन केलेला फोटो व स्वाक्षरी, आणि वैध मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.
    • 2025–2026 फेलोशिप अर्जासंबंधी अद्ययावत माहिती कुठे मिळेल?
      - तुम्ही अधिकृत सीएम फेलोशिप अपडेट फॉर्म भरून अद्ययावत माहिती मिळवू शकता. अधिक माहितीसाठी 08411960005 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा किंवा cmfellowship-mah@gov.in या ईमेलवर लिहा.

    Comments

    Permalink

    is this fellowship coming…

    प्रतिक्रिया

    is this fellowship coming twice in a year?

    Permalink

    what type of work we have to…

    प्रतिक्रिया

    what type of work we have to do in this program

    Permalink

    Is the registration for…

    प्रतिक्रिया

    Is the registration for fellowship still open?

    Permalink

    Fellowship grant credited in…

    प्रतिक्रिया

    Fellowship grant credited in another account

    Permalink

    Next fellowship forms

    प्रतिक्रिया

    Next fellowship forms

    Permalink
    Permalink

    when will 2024 cm fellowship…

    Your Name
    mahadev
    प्रतिक्रिया

    when will 2024 cm fellowship come

    Permalink

    when will 2024 fellowship…

    Your Name
    pranav
    प्रतिक्रिया

    when will 2024 fellowship form come

    In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

    Permalink

    When will the 2024 form will come

    Your Name
    Atharva vinod Hanmalwar
    प्रतिक्रिया

    Sir I have to apply for cm fellowship form.But still the form is not there . I request you the fo rm should be appeared on the online site. So many students will get benefit so I request you the form should be there and aspirants will go through the form.

    Permalink

    about fellowship

    Your Name
    Archana Ubale
    प्रतिक्रिया

    when will be start 2024 CM fellowship

    Permalink

    चीफ मिनिस्टर फेलोशिप २०२५

    Your Name
    Narendra Deulwar
    प्रतिक्रिया

    Hon,Sir chif ministar felloship सन २०२५ कधी सुरू करणार त्याची माहिती मिळाली तर आपला आभारी राहील

    Permalink

    Related CM fellowship

    Your Name
    Sunil Baban Dhule
    प्रतिक्रिया

    आदरणीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र मुख्यमंत्री फिलोशिप २०२५ योजने संदर्भातील अधिकृत संकेतस्थळ कधी कार्यरत होणार ? याबद्दल माहिती प्रदान केल्यास मदत होईल...!

    Permalink

    मुख्यमंत्री फेलोशिप योजने पात्रतेसाठी वय मर्यादा वाढविणे

    Your Name
    Sachinkumar Sambhaji Sugave
    प्रतिक्रिया

    मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत फेलोशिप पात्रतेसाठी वय मर्यादा महाराष्ट्र शासनाच्या इतर पात्रता नियमानुसार वय वर्ष 37 पर्यंत करणे श्रेयस्कर होईल जेणेकरून अनुभवी व होतकरू पात्रता धारक, उच्च शिक्षण पदवी धारक लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
    अनेक वर्ष स्पर्धा परीक्षा तयारी करणारी कार्यक्षम लाभार्थी या संधी लायक आहेत . परंतु वय मर्यादा 26 वर्षापर्यंत कमी असल्याने त्यांना संधी मिळत नाही फेलोशिप योजनेचा लाभ घेता येत नाही

    नवी प्रतिक्रिया द्या

    Plain text

    • No HTML tags allowed.
    • Lines and paragraphs break automatically.