महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना

author
जमा करणार shahrukh on Thu, 01/08/2024 - 17:15
महाराष्ट्र CM
Scheme Open
Maharashtra Maza Ladka Bhau Yojana Logo
हायलाइट्स
  • नोकरीवर ६ महिन्यांच्या कालावधीत ट्रेनिंग दिले जाईल.
  • ट्रेनिंग कालावधीत देण्यात येणारा स्टायपेंड खालीलप्रमाणे राहील :-
    • १२वी पास :- रू. ६,०००/-दर महिन्याला.
    • आयटीआय/ डिप्लोमा :- रु. ८,०००/-दर महिन्याला.
    • पदवी/ पदव्युत्त :- रु. १०,०००/- दर महिन्याला.
Customer Care
  • महास्वयम्ं हेल्पलाइन नंबर :- १८००१२०८०४१.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हेल्पलाइन नंबर :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग ईमेल:- helpdesk@sded.in.
 
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना.
लॉंच वर्ष २०२४.
फायदे नोकरीच्या ट्रेनिंगवर दर महिन्याला स्टायपेंड.
लाभार्थी महाराष्ट्राचे नागरिक.
नोडल विभाग कौशल्य, रोजगार,उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग.
सबस्क्रिबशन योजनेबद्दल अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत माझा लाडका भाऊ योजना अर्ज फॉर्म च्या द्वारे.

परिचय

  • महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पनेची पुरवणी विधानसभेत सादर करतांना अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
  • माझ्या लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेली एक योजना आहे.
  • महाराष्ट्रातील ११ लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांना योग्य नौकऱ्या मिळू शकत नाही.
  • त्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील चांगल्या नोकरीच्या संधीसाठी,त्यांना तयार करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना नोकरीचे ट्रेनिंग दिले जाईल.
  • महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हा या योजनेचा अंमलबजावणी करणारा विभाग आहे.
  • या योजनेचे मूळ नाव मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना असे आहे.
  • पण ही योजना खास तरुण मुलांसाठी आहे म्हणूनच माझा लाडका भाऊ योजना लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
  • लोक या योजनेचे नाव “माझा लाडका भाई योजना” किंवा “माझा लडका भाऊ योजना” ह्या नावांनी घेतात.
  • महाराष्ट्र सरकार सर्व पात्र तरुणांना औद्योगिक आणि विना औद्योगिक स्थापणांमद्धे नोकरीचे ट्रेनिंग देणार आहे.
  • माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत भरती झालेल्या युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड देखील दिले जाईल.
  • माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे स्टायपेंड खालीलप्रमाणे आहे :-
    • १२ वी उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. ६,०००/-.
    • आयटीआय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. ८,०००/-.
    •  पदवी किंवा पदवी उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. १०,०००/-.
  • माझा लाडका भाऊ योजनेसाठी फक्त १८ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील.
  • १२ वी, आयटीआय, डिप्लोमा धारक, पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी नोकरीच्या ट्रेनिंगसाठी अर्ज करू शकतात.
  • माझा लाडका भाऊ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे १० लाख तरुणांना मासिक स्टायपेंडसह नोकरीचे ट्रेनिंग मिळेल.
  • माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीसाठी ट्रेनिंग फक्त ६ महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाणार आहे.
  • अर्जदार युवक हे माझा लाडका भाऊ योजनेसाठी महास्वयम्ं पोर्टल यावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शासन माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना खालील लाभ दिले जातील :-
    • नोकरीवर ६ महिन्यांच्या कालावधीत ट्रेनिंग दिले जाईल.
    • ट्रेनिंग कालावधीत देण्यात येणारा स्टायपेंड खालीलप्रमाणे राहील :-
      • १२वी पास :- रू. ६,०००/-दर महिन्याला.
      • आयटीआय/ डिप्लोमा :- रु. ८,०००/-दर महिन्याला.
      • पदवी/ पदव्युत्त :- रु. १०,०००/- दर महिन्याला.

पात्रता निकष

  • माझा लाडका भाऊ योजनेचे फायदे म्हणजेच नोकरीच्या ट्रेनिंगवर महिन्याच्या स्टायपेंडसह खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या अर्जदार तरूणांनाच दिले जातील :-
    • अर्जदार तरुण हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
    • अर्ज करणाऱ्या तरुणांचे वय १८ ते ३५ वर्षा दरम्यान असावे.
    • अर्ज करणाऱ्या तरुणांची पात्रता १२वी, आयटीआय/ डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण असावे.
    • कौशल्य, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
Maharashtra Mukhyamantri Maza Ladka Bhau Yojana Eligibility in Marathi

स्थापना आणि उद्योग पात्रता

  • उद्योग आणि स्थापना फक्त माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरी ट्रेनिंगसाठी तरुणांना नियुक्त करण्यासाठी पात्र राहतील जेव्हा ते खालील पात्रता पूर्ण करतील :-
    • महाराष्ट्र राज्यात उद्योग/ स्थापना कार्यरत आहे.
    • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाइटवर नियोक्ता म्हणून नोंदणी केलेली असावी.
    • उद्योग/ स्थापना ३ वर्षांपेक्षा जुने असावी.
    • उद्योग/ स्थापना ईएसआयसी, डीपीआयआयटी, ईपीएफ आणि उद्योग आधार मध्ये नोंदणीकृत असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र शासनाच्या माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आह :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • शैक्षणिक कागदपत्रे.
    • आधार कार्ड.
    • उत्पन्नाचा दाखला.
    • पासपोर्ट साईज फोटो.
    • मोबाईल नंबर.

अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र सरकारच्या माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीच्या ट्रेनिंगसह महिन्याच्या स्टायपेंडचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
  • माझा लाडका भाऊ योजनेचा ऑनलाइन अर्ज हा महास्वयम्ं वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या नावानेही ऑनलाइन अर्ज फॉर्म शोधू शकतात.
  • अर्जदाराला प्रथम नोकरी शोधणारा म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीसाठी आधार क्रमांक गरजेचा आहे.
  • नोंदणीनंतर अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.
  • प्राप्त झालेल्या नोंदणी आयडी व पासवर्डसह वेबसाइटवर लॉगइन करावे.
  • योजनेच्या यादीतून माझा लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवाकार्यप्रशिक्षण योजना निवडावी.
  • वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती,शिक्षणाची माहिती, बँक खात्याची माहिती आणि इतर लागणारी संबंधीत माहिती माझा लाडका भाऊ योजनेच्या ऑनलाइन अर्जायामध्ये भरावे.
  • कागदपत्रे स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करावे.
  • भरलेली सर्व माहिती तपसावी आणि अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • भविष्यात वापरण्यासाठी माझा लाडका भाऊ योजना अर्जाची झेरॉक्स काढून घ्यावी.
  • महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग प्राप्त झालेल्या अर्जांनची तपासणी करतील.
  • नोकरीच्या ट्रेनिंगसाठी निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीचे ट्रेनिंग आणि महिन्याचे स्टायपेंड ६ महिन्यांचे मिळेल.
  • माझा लाडका भाऊ योजनेबद्दल काही मदत लागल्यास लाभार्थी युवक त्यांच्या कौशल्य विकास जिल्हा कार्यालय, उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • महास्वयम्ं हेल्पलाइन नंबर :- १८००१२०८०४१.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हेल्पलाइन नंबर :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग ईमेल:- helpdesk@sded.in.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र ,
    मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरू चौक ,
    मुंबई - ४०००३२.
Person Type योजना प्रकार Govt

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: नोकरी

Sno CM Scheme Govt
1 Agnipath Scheme केंद्र सरकार
2 PM Employment Linked Incentive Scheme A: First Timers केंद्र सरकार
3 PM Employment Linked Incentive Scheme B: Job Creation in Manufacturing केंद्र सरकार
4 PM Employment Linked Incentive Scheme C: Support to Employers केंद्र सरकार

Comments

Permalink

Your Name
Gajanan.bandujee.wankhede
प्रतिक्रिया

Sarv.anubhav.ahe

Permalink

Your Name
Muzammil Iqbal Shaikh
प्रतिक्रिया

Good

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format