
हायलाइट्स
- ६ महिन्यांचे नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षणादरम्यान खालीलप्रमाणे स्टायपेंड दिले जाईल :-
पात्रता स्टायपेंड
(दर महिन्याला)१२वी पास रु. ६,०००/- आयटीआय/डिप्लोमा रु. ८,०००/- पदवी/ पदव्युत्तर रु. १०,०००/-
संकेतस्थळ
Customer Care
- महाराष्ट्र महास्वयंम हेल्पलाइन क्रमांक :- १८००१२०८०४१.
- महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२६२५६५१.
- ०२२-२२६२५६५३.
- महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग ईमेल :- helpdesk@sded.in.

योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. |
लॉंच वर्ष | २०२४. |
फायदे | नोकरी प्रशिक्षणावर मासिक रु.६,०००/- ते १०,०००/- स्टायपेंडसह. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण. |
नोडल विभाग | कौशल्य,रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग. |
सबसक्रीपशन | महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत | मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अर्जाद्वारे. |
परिचय
- सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी ११ लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात.
- काहींना नोकरी मिळू शकते तर काही विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळू शकत नाही.
- त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना लवकरच सुरू होणार आहे.
- “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” असे या योजनेचे नाव आहे.
- याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प पुरवणी सादर करतांना केली.
- महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
- महाराष्ट्र सरकार आता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण देणार आहे.
- औद्योगिक आणि विना औद्योगिक आस्थापनांनमध्ये नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.
- मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना उद्योगांमधील मनुष्यबळाची गरज पूर्ण करेल आणि गरजू लोकांना रोजगरची संधीही उपलब्ध करून देईल.
- ऑन जॉब ट्रेनिंग व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार दरमहा स्टायपेंड देखील प्रदान केले जाईल.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडक तरुणांना खालील मासिक स्टायपेंड दिले जाईल :-
- १२ वी पास असलेल्यांना रु. ६,०००/- प्रती महिना.
- आयटीआय किंवा डिप्लोमा पास असलेल्यांना रु. ८०००/-प्रती महिना.
- पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असलेल्यांना रु. १०,०००/- प्रती महिना.
- १८ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील लाभार्थी केवळ नोकरी प्रशिक्षण योजनेत अर्ज करण्यास पात्र आहेत.
- १२ वी, आयआयटी, डिप्लोमा धारक, पदवी,पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेच्या सुरक्षित अमलबाजवणीसाठी शासनाने १०,०००/- कोटी रुपयांचे बजेट आकरले.
- महाराष्ट्रातील सुमारे १०,००,००० तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण मिळेल असा अंदाज आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या महास्वयं पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्ज फॉर्म द्वारे लाभार्थी युवक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
योजनेचे फायदे
- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत :-
- ६ महिन्यांचे नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षणादरम्यान खालीलप्रमाणे स्टायपेंड दिले जाईल :-
पात्रता स्टायपेंड
(दर महिन्याला)१२वी पास रु. ६,०००/- आयटीआय/डिप्लोमा रु. ८,०००/- पदवी/ पदव्युत्तर रु. १०,०००/-
पात्रता निकष
- मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण आणि स्टायपेंड फक्त अश्या तरूणांनाच दिले जाईल जे खालील पात्रता निकष पूर्ण करतात :-
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार ग्रॅजुएट, पोस्ट ग्रॅजुएट किंवा डिप्लोमा धारक असावा.
- उर्वरित पात्रता निकष लवकरच जाहीर जेले जातील.
- अर्जदार १२ वी पास ,आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर किंवा डिप्लोमा धारक असावा.
- अर्जदारणे कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी केली पाहिजे.

स्थापना आणि उद्योगांसाठी पात्रता
- केवळ तेच उद्योग आणि स्थापना ,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी प्रशिक्षणासाठी तरूणांची नियुक्ती करण्यास पात्र आहेत जे खालील पात्रता अटी पूर्ण करतात :-
- महाराष्ट्र राज्याच्या आत काम करणे.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आई इनोव्हेशन विभागाच्या वेबसाइटवर, नियोक्ता म्हणून नोंदणीकृत असावे.
- ३ वर्षांपेक्षा मोठे असावे.
- डीपीआयआयटी, ईएसआयसी, ईपीएफ आणि उद्योग आधारासह नोंदणीकृत असावे.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
- महाराष्ट्र निवासी पुरावा.
- आधार कार्ड.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- मोबाइल नंबर.
- पासपोर्ट साइज फोटो.
- उत्पन्न दाखला.
अर्ज कसा करावा
- पात्र युवक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज याद्वारे अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा ऑनलाइन अर्ज हा महास्वयंम वेबसाइट यावर उपलब्ध आहे.
- लाभार्थी तरुणांना प्रथम नोकरी शोधक म्हणून नोंदणी करावी लागेल.
- नोंदनिसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.
- लाभार्थी युवकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर नोंदणी आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
- आयडी आणि पासवर्डच्या मदतीने वेबसाइटवर लॉगइन करा.
- योजनेच्या यादीतून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना निवडा.
- वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शिक्षण माहिती, बँक खाते माहिती आणि इतर संबंधित माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक पहा आणि अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- भविष्यातील संदर्भासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अर्जाची प्रिंटआउट घ्या.
- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजक्ता, आणि इनोव्हेशन विभाग प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करेल.
- निवडलेल्या युवकांना त्यांची निवड आणि ज्या रोजगार प्रशिक्षणासाठी त्यांची निवड जाळली आहे त्याबद्दल एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
- लाभार्थी युवकांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ६ महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर मासिक स्टायपेंड मिळेल.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मदतीची आवंशक्यता असल्यास,लाभार्थी युवक त्यांच्या कौशल्य विकास जिल्हा कार्यालय,उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज फॉर्म.
- महाराष्ट्र महास्वयं वेबसाइट.
- महाराष्ट्र कौशल्य, उद्योजक्ता, आणि इनोव्हेशन विभाग वेबसाइट.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंग्लीश मार्गदर्शक तत्त्वे.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मराठी मार्गदर्शक तत्त्वे.
संपर्क माहिती
- महाराष्ट्र महास्वयंम हेल्पलाइन क्रमांक :- १८००१२०८०४१.
- महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
- ०२२-२२६२५६५१.
- ०२२-२२६२५६५३.
- महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग ईमेल :- helpdesk@sded.in.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग, महाराष्ट्र,
मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई -४०००३२.
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Person Type | Govt |
---|---|
Stay Updated
×
Comments
what about cm fellowship why…
what about cm fellowship why it closed
is it started
is it started
Link
Link
Error in website
Error in website
Form
Form
Jobseeker registration error
Jobseeker registration error
web is not working
not work this web
बेरोजगार
बेरोजगार
apply online
apply online
Scheme
My
real name is scheme ka
real name is scheme ka
eligible trades in yuva…
eligible trades in yuva karyaprashikshan yojana
it is permanent jobs?
it is permanent job or not
Why online form filling site…
Why online form filling site is close from Last 2 days
नविन नोंद करण्यात यावी
माननीय मुख्यमंत्री साहेब,
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना खुप चांगली कल्पना असुन, बेरोजगार कमी करण्याचा प्रयत्न करत आहात; पण साहेब जे युवा अर्ज करण्यात साठी नेट वर गेले.तेव्हाच साईटवर चालू नाही ऐ ?
अस का?
जे युवा अर्ज करायला तयार आहेत .
पण त्याना ति संधी मिळायलाच हवी
ही माहीत नंमृ विनंती आहे साहेब
महानंदा डोखळे
Plz plz starting website
Plz plz starting website
Berojgar yuva traning
This scheme has. Very good for young student
For job
Jobseeker registration error
Jobseeker registration error
Rojgar uplabdha karun denya babat
Mi NITESH CHAUDHARI online nandani kelo ahe.
skill for employment
support us for future and employment
नवी प्रतिक्रिया द्या