महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना

जमा करणार shahrukh on Thu, 25/07/2024 - 14:07
महाराष्ट्र CM
Scheme Open
Maharashtra Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana Budget Info
हायलाइट्स
  • ६ महिन्यांचे नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • प्रशिक्षणादरम्यान खालीलप्रमाणे स्टायपेंड दिले जाईल :-
    पात्रता स्टायपेंड
    (दर महिन्याला)
    १२वी पास रु. ६,०००/-
    आयटीआय/डिप्लोमा रु. ८,०००/-
    पदवी/ पदव्युत्तर रु. १०,०००/-
Customer Care
  • महाराष्ट्र महास्वयंम हेल्पलाइन क्रमांक :- १८००१२०८०४१.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग ईमेल :- helpdesk@sded.in.
Maharashtra Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana Information
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना.
लॉंच वर्ष २०२४.
फायदे नोकरी प्रशिक्षणावर मासिक रु.६,०००/- ते १०,०००/- स्टायपेंडसह.
लाभार्थी महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण.
नोडल विभाग कौशल्य,रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग.
सबसक्रीपशन महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अर्जाद्वारे.

परिचय

  • सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी ११ लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात.
  • काहींना नोकरी मिळू शकते तर काही विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळू शकत नाही.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना लवकरच सुरू होणार आहे.
  • “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” असे या योजनेचे नाव आहे.
  • याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प पुरवणी सादर करतांना केली.
  • महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • महाराष्ट्र सरकार आता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण देणार आहे.
  • औद्योगिक आणि विना औद्योगिक आस्थापनांनमध्ये नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना उद्योगांमधील मनुष्यबळाची गरज पूर्ण करेल आणि गरजू लोकांना रोजगरची संधीही उपलब्ध करून देईल.
  • ऑन जॉब ट्रेनिंग व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार दरमहा स्टायपेंड देखील प्रदान केले जाईल.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडक तरुणांना खालील मासिक स्टायपेंड दिले जाईल :-
    • १२ वी पास असलेल्यांना रु. ६,०००/- प्रती महिना.
    • आयटीआय किंवा डिप्लोमा पास असलेल्यांना रु. ८०००/-प्रती महिना.
    • पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असलेल्यांना रु. १०,०००/- प्रती महिना.
  • १८ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील लाभार्थी केवळ नोकरी प्रशिक्षण योजनेत अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • १२ वी, आयआयटी, डिप्लोमा धारक, पदवी,पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेच्या सुरक्षित अमलबाजवणीसाठी शासनाने १०,०००/- कोटी रुपयांचे बजेट आकरले.
  • महाराष्ट्रातील सुमारे १०,००,००० तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण मिळेल असा अंदाज आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या महास्वयं पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्ज फॉर्म द्वारे लाभार्थी युवक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत :-
    • ६ महिन्यांचे नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल.
    • प्रशिक्षणादरम्यान खालीलप्रमाणे स्टायपेंड दिले जाईल :-
      पात्रता स्टायपेंड
      (दर महिन्याला)
      १२वी पास रु. ६,०००/-
      आयटीआय/डिप्लोमा रु. ८,०००/-
      पदवी/ पदव्युत्तर रु. १०,०००/-

पात्रता निकष

  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण आणि स्टायपेंड फक्त अश्या तरूणांनाच दिले जाईल जे खालील पात्रता निकष पूर्ण करतात :-
    • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
    • अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे.
    • अर्जदार ग्रॅजुएट, पोस्ट ग्रॅजुएट किंवा डिप्लोमा धारक असावा.
    • उर्वरित पात्रता निकष लवकरच जाहीर जेले जातील.
    • अर्जदार १२ वी पास ,आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर किंवा डिप्लोमा धारक असावा.
    • अर्जदारणे कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी केली पाहिजे.
Maharashtra Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana Eligibility in Marathi

स्थापना आणि उद्योगांसाठी पात्रता

  • केवळ तेच उद्योग आणि स्थापना ,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी प्रशिक्षणासाठी तरूणांची नियुक्ती करण्यास पात्र आहेत जे खालील पात्रता अटी पूर्ण करतात :-
    • महाराष्ट्र राज्याच्या आत काम करणे.
    • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आई इनोव्हेशन विभागाच्या वेबसाइटवर, नियोक्ता म्हणून नोंदणीकृत असावे.
    • ३ वर्षांपेक्षा मोठे असावे.
    • डीपीआयआयटी, ईएसआयसी, ईपीएफ आणि उद्योग आधारासह नोंदणीकृत असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • महाराष्ट्र निवासी पुरावा.
    • आधार कार्ड.
    • शैक्षणिक कागदपत्रे.
    • मोबाइल नंबर.
    • पासपोर्ट साइज फोटो.
    • उत्पन्न दाखला.

अर्ज कसा करावा

  • पात्र युवक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज याद्वारे अर्ज करू शकतात.
  • महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा ऑनलाइन अर्ज हा महास्वयंम  वेबसाइट यावर उपलब्ध आहे.
  • लाभार्थी तरुणांना प्रथम नोकरी शोधक म्हणून नोंदणी करावी लागेल.
  • नोंदनिसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.
  • लाभार्थी युवकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर नोंदणी आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
  • आयडी आणि पासवर्डच्या मदतीने वेबसाइटवर लॉगइन करा.
  • योजनेच्या यादीतून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना निवडा.
  • वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शिक्षण माहिती, बँक खाते माहिती आणि इतर संबंधित  माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक पहा आणि अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  • महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजक्ता, आणि इनोव्हेशन विभाग प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करेल.
  • निवडलेल्या युवकांना त्यांची निवड आणि ज्या रोजगार प्रशिक्षणासाठी त्यांची निवड जाळली आहे त्याबद्दल एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
  • लाभार्थी युवकांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ६ महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर मासिक स्टायपेंड मिळेल.
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मदतीची आवंशक्यता असल्यास,लाभार्थी युवक त्यांच्या कौशल्य विकास जिल्हा कार्यालय,उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • महाराष्ट्र महास्वयंम हेल्पलाइन क्रमांक :- १८००१२०८०४१.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग ईमेल :- helpdesk@sded.in.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि इनोव्हेशन विभाग, महाराष्ट्र,
    मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
    मुंबई -४०००३२.

Comments

Permalink

Your Name
shivam
प्रतिक्रिया

is it started

Permalink

Your Name
Neetu
प्रतिक्रिया

Link

Permalink

Your Name
Mayuri
प्रतिक्रिया

Error in website

Permalink

Your Name
Narsingh
प्रतिक्रिया

Form

Permalink

Your Name
manjeet
प्रतिक्रिया

apply online

Permalink

Your Name
Parvez shaikh
प्रतिक्रिया

My

Permalink

Your Name
sumit
प्रतिक्रिया

eligible trades in yuva karyaprashikshan yojana

Permalink

Your Name
Rahul Gonyal
प्रतिक्रिया

it is permanent job or not

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format