महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्ट अप योजना

author
जमा करणार shahrukh on Wed, 19/02/2025 - 14:44
महाराष्ट्र CM
Scheme Open
Maharashtra Punyashlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme Information
हायलाइट्स
  • स्टार्टअप्ससाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
  • रु. १,००,०००/- पासून तर रु.२५,००,०००/-आर्थिक सहाय्य प्रदान केले जातील.
Customer Care
  • महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी हेल्पलाइन नंबर :- ०२२-३५५४३०९९.
  • महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी हेल्पडेस्क ईमेल :- team@msins.in.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्ट अप योजना.
लॉंच वर्ष २०२४.
फायदे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी आर्थिक मदत.
लाभार्थी महाराष्ट्रातील महिला उद्योजक.
नोडल विभाग कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग.
अंमलबजावणी करणारी संस्था महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी.
सबस्क्रिप्शन योजनेबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्ट अप योजना ऑनलाइन अर्ज फॉर्म.

परिचय

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेची घोषणा अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी २८/०६/२०२४ रोजी पुरवणी अर्थसंकल्प सादर करतांना केली.
  • ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना निधी देणे, जेणेकरून महिल्यांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला चालना मिळेल आणि उत्पादनक्षम व्यवसाय वाढ होईल.
  • ही योजना महिलांच्या स्टार्टअपला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यास मदत करते.
  • महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • तर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
  • ही योजना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” म्हणून ओळखली जाते.
  • महाराष्ट्र सरकार आता महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना आर्थिक मदत करेल.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत सर्व स्टार्टअप महिला उद्योजकांना रु. १,००,०००/- पासून ते रु २५,००,०००/- आर्थिक सहाय्य प्रदान केले जातील.
  • १ वर्षापेक्षा जून स्टार्टअप केवळ आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • सहाय्य मिळवण्यासाठी डिपीआयआयटी आणि एमसीए मध्ये नोंदणी करणे देखील अनिवार्य आहे.
  • जर महिला उद्योजकांच्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल रु. १०,००,०००/-च्या खाली असेल तर ते स्टार्टअप या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य घेण्यास पात्र नाहीत.
  • आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी महिला उद्योजकांना कंपनी/ स्टार्टअपमध्ये किमान ५१% भागीदारी असणे देखील बंधनकारक आहे.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज आता उपलब्ध आहे.
  • महिला उद्योजक १४ ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्रात नोंदणीकृत महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सना महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत खालील फायदे मिळतील :-
    • स्टार्टअप्ससाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
    • रु. १,००,०००/- पासून तर रु.२५,००,०००/-आर्थिक सहाय्य प्रदान केले जातील.
Maharashtra Punyashlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme Eligibility in Marathi

पात्रता निकष

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या खालील पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य दिले जाईल :-
    • महिला लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
    • स्टार्टअप डीपीआयआयटी आणि एमसीएमध्ये नोंदणीकृत असावे.
    • स्टार्टअपची नोंदणी महाराष्ट्रात झाली पाहिजे.
    • महिला लाभार्थीचा कंपनीत ५१% हिस्सा असावा.
    • महिला लाभार्थीचे स्टार्टअप १ वर्षापेक्षा जास्त वयाचे असावे.
    • महिला लाभार्थी स्टार्टअपची वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी दरम्यान असावी.
Maharashtra Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Scheme Eligibility

आवश्यक कागदपत्रे

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत स्टार्टअप साठी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली जातील :-
    • पिच डेक.
    • एमसीए प्रमाणपत्र.
    • डीपीआयआयटी प्रमाणपत्र.
    • लेखीपरीक्षण अहवाल. (अनिवार्य नाही)
    • कंपनी लोगो.
    • संस्थापकाचा फोटो.
    • उत्पादन/ सेवा फोटो.

अर्ज कसा करावा

  • स्वत: स्टार्टअप चालवणारी कोणतीही महिला उद्योजक ऑनलाइन अर्जाद्वारे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेअंतर्गत आर्थिक निधीसाठी अर्ज करू शकते.
  • महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यावरवर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये खालील माहिती भरा :-
    • स्टार्ट आपचे नाव.
    • महिला संस्थापक नाव.
    • संस्थापक ईमेल.
    • श्रेणी निवड.
    • मोबाईल नंबर.
    • स्टार्ट अपचा संघ आकार.
    • सेक्टर निवडा.
    • कंपनीचा प्रकार निवडा.
    • स्टार्ट अपची नोंदणी तारीख.
    • डीपीआयआयटी क्रमांक.
    • कंपनीची वेबसाइट.
    • कंपनीचा पत्ता.
    • जिल्हा.
    • शहर.
    • स्टार्टअप बद्दल वर्ण.
    • स्टार्टअप जय समस्येला तोंड डेट आहे त्याचे वर्णन.
    • सेवा/उत्पादनाचे वर्णन.
    • स्टार्टअपचा मोठ्या प्रमाणावर होणार परिणाम स्पष्ट करा.
    • उलाढाल तपशील.
  • त्यानंतर खाली नमूद केलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
    Maharashtra Punyashlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme Documents Requred
  • भरलेल्या माहितीचे पूर्णपणे पूर्वावलोकन करा आणि नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या सबमिट केलेल्या अर्जाची विभागाच्या अधिकाऱ्याकडून छाननी केली जाईल.
  • शॉर्टलिसटेड स्टार्टअप्सना नंतर संपूर्ण मूल्यांकनासाठी बोलावले जाईल.
  • निवडक स्टार्टअप्सना त्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य वितरित केले जाईल.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १४-०८-२०२४ आहे.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी हेल्पलाइन नंबर :- ०२२-३५५४३०९९.
  • महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी हेल्पडेस्क ईमेल :- team@msins.in.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२६२५६५१.
    • ०२२-२२६२५६५३.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग ईमेल :- helpdesk@sded.in.
  • महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग, महाराष्ट्र,
    मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
    मुंबई-४०००३२.
Person Type योजना प्रकार Govt

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: व्यवसाय

Sno CM Scheme Govt
1 Credit Guarantee Scheme for Startups केंद्र सरकार
2 Prime Minister's Employment Generation Programme केंद्र सरकार

Comments

Permalink

what is pitch deck

Your Name
chaya
प्रतिक्रिया

what is pitch deck

Permalink

Registration errror

Your Name
Manoj
प्रतिक्रिया

Registration errror

In reply to by cool.shar.ukh…

Permalink

same issue with me

Your Name
nithya
प्रतिक्रिया

same issue with me

In reply to by cool.shar.ukh…

Permalink

otp is not coming

Your Name
amita bhargava
प्रतिक्रिया

otp is not coming

In reply to by cool.shar.ukh…

Permalink

same error occur

Your Name
sachin
प्रतिक्रिया

same error occur

Permalink

which startups are eligible

Your Name
akriti
प्रतिक्रिया

which startups are eligible

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.