
हायलाइट्स
- २०००/- रुपयांचे मोफत बेबी केअर कीट.
- प्रत्येक किटमध्ये बाळाच्या दैनंदिन काळजीसाठी १७ वस्तु असतात.
संकेतस्थळ
Customer Care
- महाराष्ट्र महिला आणि बाळविकास विभाग क्रमांक- ०२२२ २२०२७०५०.
- महिला आणि बाळविकास विभाग महाराष्ट्र यांचा संपर्क तपशील.
योजनेचा सारांश | |
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र बेबी केअर कीट योजना. |
लॉंच झालेले वर्ष | २०१९ |
फायदे | २०००/- रुपयांचे बेबी केअर कीट. |
लाभार्थी | राज्याच्या नवीन माता. |
नोडल विभाग | महिला आणि बाळविकास विभाग महाराष्ट्र |
सदस्यता | योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी येथे सदस्यता घ्या. |
अर्ज करण्याची पद्धत | बेबी केअर कीट योजनेच्या अर्जाद्वारे. |
योजनेचा परिचय: थोडक्यात आढावा
- बेबी केअर कीट योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे.
- ही योजना सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश राज्यातील गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी आरोग्य केंद्रात बाळंतपण करण्यास प्रोत्साहित करणे आहे.
- या योजनेद्वारे, राज्याचा बाळमृत्यू दर कमी करणे आणि आई आणि तिच्या नवजात बाळाच्या पोषणाची स्थिती सुधारणे हे देखील सरकारचे उद्दीष्ट आहे.
- या योजनेचा नोडल विभाग महिला आणि बाळविकास विभाग महाराष्ट्र शासन.
- महाराष्ट्र सरकारच्या बेबी केअर कीट योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना २०००/-रुपयांचे मोफत बेबी केअर कीट प्रदान केले जाईल.
- प्रत्येक बाळाच्या काळजीच्या किटमध्ये नवजात बळासाठी दैनंदिन वापराच्या १७ वस्तु असतात.
- बेबी केअर कीट योजनेअंतर्गत नवीन मातांना त्यांच्या बळासाठी दिल्या जाणाऱ्या १७ वस्तूंची यादी खालील प्रमाणे आहे:-
- प्लास्टीक न्यापीज
- बाळांचे कपडे
- बाळाची झोपण्याची चटई
- बळासाठी रुमाल
- ताप मोजायचे यंत्र
- बाळासाठी उबदार ब्लँकेट
- मच्छरदाणी
- लहान प्लॅस्टिकची चटई
- बाळासाठी नेल कटर
- शाम्पु
- खेळणी
- मोजे आणि नेल कटर ग्लोज
- हाथ धुवायचे लिक्विड
- बॉडी वॉश
- बाळांना गुंडाळण्यासाठी कपडे
- वस्तु ठेवण्यासाठी बॅग
- नवजात बाळाची तसेच आईची स्वच्छता राखण्यासाठी वरील सर्व वस्तु आवश्यक आहेत.
- बेबी केअर कीट फक्त त्या महिला लाभार्थ्यांनाच प्रदान केले जाईल ज्या नोंदणीकृत आहेत आणि सरकारी रुग्णालयात किंवा आरोग्य सेवा केंद्रात बाळंतपण करतात.
- तथापि काही विशेष प्रकरणांमध्ये, ज्या लाभार्थ्यांनी खाजगी रुग्णालयात बाळंतपण केले आहे त्यांना बाळ काळजी कीट देखील प्रदान केले जाईल.
- तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात अर्ज करा आणि मोफत बेबी केअर किटचा लाभ घ्या.
- महिला लाभार्थी त्यांच्या गर्भधारणेदरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेसाठी देखील अर्ज करू शकतात,ज्यामध्ये आर्थिक मदत दिली जाईल.
- जर जन्मलेल मूल मुलगी असेल तर महिला अर्जदार तिला महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेत नोंदणी करू शकते ज्यामध्ये अनेक टप्प्यात १ लाखापेक्षा जास्त रक्कम दिली जाईल.
योजनेचे फायदे
- २०००/- रुपयांचे डेलि केअर बेबी कीट प्रदान केले जाईल.
- नवजात बाळासाठी बेबी केअर किटमध्ये १७ वस्तु आहेत.
आवश्यक पात्रता
- महिला अर्जदारांनी त्यांच्या गारोदरपानाच्या ९ व्या महिन्यात असणे आवश्यक आहे.
- गर्भवती महिला महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी रहिवासी असाव्यात.
- सरकारी रुग्णालयात बाळाची नोंदणी आणि प्रसूती अनिवार्य आहे.
- गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या ९ व्या महिन्यात स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- बाळाच्या जन्मानंतर २ महिन्यानंतर देखील अर्ज स्वीकारले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास किंवा निवासाचा कोणताही पुरावा.
- महिला अर्जदाराचे आधारकार्ड.
- ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक.
- एएनसी किंवा ममता कार्डची प्रत.
- संस्थात्मक वितरणाचा पुरावा.
अर्ज करण्याची पद्धत
- लाभार्थी महिला महाराष्ट्र सरकारच्या बेबी केअर कीट योजनेअंतर्गत बेबी केअर कीटसाठी अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात.
- बेबी केअर कीट योजनेचा अर्ज अंगणवाडी केंद्रामधून घेत येईल.
- अंगणवाडी सेविकाकडून अर्ज घ्या आणि तो योग्यरित्या भरा.
- महिला अर्जदारांना अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- बेबी केअर कीट योजनेचा अर्ज सर्व कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्रात जमा करा.
- अंगणवाडी सेविका प्रामुख्याने प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करेल आणि पात्र महिला लाभार्थ्यांची यादी तयार करेल.
- निवडलेल्या महिला लाभार्थ्यांची यादी नंतर किटच्या मंजुरीसाठी विभागाकडे पाठवली जाईल.
- महाराष्ट्र सरकारचा महिला आणि बाळविकास विभाग अंगणवाडी केंद्रांना योग्य संख्येने बाळांना काळजीसाठी कीट पोहोचवेल याची खात्री करेल.
- अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना बाळांच्या सांगोपणाच्या किटचे वाटप करतील.
- अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या स्थानिक अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा.
संबंधीत लिंक
संपर्क माहिती
- महाराष्ट्र महिला आणि बाळविकास विभाग क्रमांक:- ०२२ २२०२७०५०.
- महिला आणि बाळविकास विभाग महाराष्ट्र यांचे संपर्क तपशील.
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Govt |
---|
Stay Updated
×
नवी प्रतिक्रिया द्या