रमाई आवास योजना 2023-24 घोटाळा.

Description
नमस्कार, मी मौजे सांडोळ येथील रहिवाशी असून आमची ग्रामपंचायत दोन गावाची मिळून आहे आणि ग्रामपंचायत ऑफिस महांडोळ या गावी आहे.काही दिवसापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत 2023-24 घर मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे,त्या यादी मध्ये मागच्या काही वर्षात 2019-23 ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्याच परिवरातील व्यक्तींची नावे आहेत.जसे त्यांचा मुलगा,बायको इत्यादी आणि त्यांचे घर अगोदरच या योजनेअतर्गत बांधून झाले आहे. ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे त्यांना डावलून आपला वैयक्तिक लाभ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच घरातील व्यक्तींना लाभ देण्यात आला आहे,तरी याची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात येऊन खऱ्या लाभार्थीना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती आहे.. मिलिंद सोनकांबळे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format