मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज रिजेक्ट/disapproved केल्या बद्दल तक्रार अर्ज.

Description
मा. महोदय, माझी आई सौ. सुशीला दिपक हुलावळे, यांचा ऑनलाईन अर्ज मी नारी शक्ती धूत या प्ले स्टोअर च्या अँप्लिकेशन मधून केला होता. त्यांचा हा अर्ज ह्या कारणानी रिजेक्ट/disapproved करण्यात आला की, जोडलेल्या रेशन कार्ड वर वार्षिक उत्पन्न लिहिलेले नाही. आपल्या सरकारच्या website वर काय लिहिले आहे की, एकतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडावे नाहीतर 250000/- च्या आत उत्पन्न असलेले उत्पन्न प्रमाण पत्र जोडावे. आता तुम्हीच सांगा रेशन कार्ड वर कुठे वार्षिक उत्पन्न लिहिलेले असते? मी अनेक जणांचे अर्ज ऑनलाईन करून दिले, कोणाचेच रिजेक्ट झाले नाही आणि नेमके माझ्या आईचेच रिजेक्ट/disapproved झाले. असे ही नाही की आमचे केशरी रेशन कार्ड नवीन आहे. खूप 25 वर्षापेक्षा जास्त जुने आहे. आपल्या माहितीसाठी मी ऑनलाईन अर्जाचे फोटो या मेल ला attach केले आहे. कृपया ते चेक करा. आणि आपल्याला विनंती करतो की, आपण योग्य ती छाननी करून हा अर्ज लवकरात लवकर approve करा. आपला विश्वासू, दर्शन दिपक हुलावळे.

Comments

Permalink

Your Name
Pramod manik jadhav
Comment

माझे नातेवाईक सुद्धा फॉर्म भरत असताना त्यांना NO NEW FORM ACCEPTED असे आले आणि ॲप अचानक लोग आऊट झालं.फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31ऑगस्ट पर्यंत असून देखील...

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format